History of Maharashtra

एटीएमधारकाला ठकवणारा तीन तासांत गजाआड

अहमदनगर । DNA Live24 -
टीएममधून पैसे काढला येत नसल्याचा गैरफायदा घेऊन एका व्यक्तीला फसवण्यात आले. हा प्रकार मार्केटयार्ड जवळच्या नेवासकर पंपावर असलेल्या एटीएम केंद्रावर रविवारी घडला. मात्र,कोतवाली पोलिसांनी वेगाने या गुन्ह्याचा तपास करुन तीन तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या टीमने ही कामगिरी केली.

कृष्णनाथ भाऊसाहेब पवळ (रा. मोहिनीनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांना एटीएममधून पैसे काढण्याची माहिती नव्हती. ही बाब लक्षात येताच एका व्यक्तीने त्यांना पासवर्ड विचारुन घेतला. नंतर त्यांची नजर चुकवून त्यांचे कार्ड बदलून दिले. काही वेळाने त्यांच्या खात्यावरील २९ हजार २०४ रुपये काढून घेतले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी फसवणुक व आर्थिक अपहाराचा गुन्हा नोंदवला.

पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पाटील यांच्या टीमने वेगाने तपास केला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी माधव उर्फ सोन्या बापू आहेर (२५, रा.बैराणी वाड्याजवळ, सावरकर चौक, निफाड, नाशिक) याला पकडले. रेल्वे स्टेशन परिसरात त्याला पकडण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे त्याला ताब्यात घेतले. अधिक तपास एपीआय पाटील हे करीत आहेत. अनोळखी व्यक्तीला एटीएम कार्ड, पिन क्रमांक देवू नये, असे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.

Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget