History of Maharashtra

पांगरमल दारुकांड - IG उगारणार दोषी पोलिसांवर कारवाईचा बडगा

अहमदनगर । DNA Live24 - पांगरमल गावातील ९ जणांचे बळी बनावट दारुमुळेच गेल्याचे सिद्ध झाले आहे. पण बनावट दारु तयार करणाऱ्या आरोपींसोबत काही पोलिसांची चांगलीच सलगी होती. या पोलिसांची चौकशीही करण्यात आली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनीही पोलिस दलाचा आढावा घेतला आहे. आयजी चौबे हे सोमवारपासून नगरमध्येच तळ ठोकून आहेत. पांगरमल प्रकरणातील आरोपींसोबत सख्य असलेल्या पोलिसांवर ते कारवाई करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पांगरमल (ता. नगर) येथे राजकीय उमेदवारांनी दिलेल्या पार्टीमध्ये दारु पिल्यामुळे ९ जणांचे बळी गेले. पारनेर व नगर तालुक्यातील चौघांचे मद्यसेवनामुळे बळी गेले. बनावट मद्यनिर्मितीच्या रॅकेटचे धागेदोरेही धुळ्यापर्यंत पाेहोचले आहेत. पोलिसांनी धुळ्यातील कुख्यात मद्यतस्कर दादा वाणी याला अटक केली आहे. त्यामुळे नगरचे दारुकांड राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे. विरोधी पक्षनेते व पालकमंत्र्यांनी पांगरमलला भेटी देवून आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी तशी प्रक्रियाही सुरू केली आहे. हे प्रकरण आगामी विधानसभा अधिवेशनामध्येही गाजण्याचे संकेत आहेत.

अशा पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे सोमवारी सकाळी नगरमध्ये दाखल झाले. पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह तपासी अधिकारी आनंद भोईटे हे बैठकीला उपस्थित होते. त्यांच्याकडून आयजी चौबे यांनी पांगरमल दुर्घटनेचा आढावा घेतला. गुन्ह्याच्या तपासाचीही सखोल माहिती घेतली. बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या रॅकेटमधील आरोपींसोबत काही पोलिसांचे संपर्क असल्याचेही त्यांच्या लक्षात अाले.

बनावट दारुनिर्मितीच्या रॅकेटमधील आरोपींना ताब्यात घेतले, तेव्हाच त्यांचे व काही पोलिसांचे असलेले सबंध समोर आले होते. या आरोपींचे काही पोलिसांसोबत अर्थपूर्ण संबंध असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्याकडे याबाबत चौकशी सोपवण्यात आलेली होती. अतिरिक्त अधीक्षक पाटील यांनी गेल्या आठवड्यापासून कसोशीने ही चौकशी केली. काही संशयितांचीही त्यांनी कसून चौकशी केली. त्याचा आढावाही त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांपुढे मांडलेला आहे. सोमवारी दिवसभर झाडाझडती घेतल्यानंतर आता तेच दोषी पोलिसांवर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पांगरमल प्रकरणात आता पोलिसांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागलेले आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget