728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

पुण्यात काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पुणे । DNA Live24 - राज्यात काँग्रेस पक्षांतर्गत वादामुळे नेहमीच चर्चेत आहे. मुंबईत संजय निरूपम आणि अन्य नेत्यांमध्ये पेटलेल्या शीतयुद्धामुळे पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आता हा पक्षांतर्गत वाद पुण्यातही जोरात सुरू आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांच्या समर्थनार्थ पुण्यात पोस्टर्स झळकत आहेत. “कलमाडी को लाओ, काँग्रेस बचाओ” आणि “तिकीट विकणाऱ्यांना हटवा, काँग्रेस वाचवा” अशी वाक्य या पोस्टरवर लिहिण्यात आली आहेत. मात्र ही पोस्टर कुणी लावली, हे अद्याप समजू शकलेले नाही. पुण्यातील या पोस्टरबाजीमुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

मुंबई काँग्रेसमध्येही तिकीट वाटपावरुन मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात अनेक नेते समोर आले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत, नारायण राणे यांनी संजय निरुपमांविरोधातील नाराजी जाहिरपणे बोलून दाखवली होती. तर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांची एकाधिकारशाही असल्याचे सांगत पक्षाला रामराम ठोकला होता.

आता हीच परिस्थिती पुणे काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने पैसे घेऊन उमेदवारांना तिकीट वाटप केल्याच आरोप होत आहे. त्यामुळे निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. काँग्रेसने उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर नाराज इच्छुकांनी काँग्रेस भवनमध्ये टाळ कुटून आंदोलन केले होते. आता शहरात पोस्टरबाजी सुरू झाल्यामुळे काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर आला आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: पुण्यात काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर Rating: 5 Reviewed By: DNA Live24