728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

अकोले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेरीस

अकोले । DNA Live24 - तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ३ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचे जिल्हा परिषदेच्या गट गणातून सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे अकोले तालुक्यात भाजपला शंभर टक्के विजय प्राप्त झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र तालुक्यात निवडणुकीत भाजपने चांगलेच जेरीस आणले.

अकोले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला व शिवसेनेला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यातून युतीने हिसकावून घेतली आहे. पंचायत समितीच्या एकूण १२ जागांपैकी भाजप ४, शिवसेना ४, राष्ट्रवादी ४, असे बलाबल राहिले. एकंदरीत अकोले तालुक्यात माजी मंत्री मधुकर पिचड आमदार वैभव पिचड यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून बलशाली राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी घरघर लागली असल्याचे चित्र या निवडणुकीने स्पष्ट केले. 

सातेवाडी गटातून डाॅ. किरण लहामटे हे ५७६४ सर्वात जास्त मताधिक्य मिळवून विजयी झाले. तर ११३ सर्वात कमी मताधिक्य मिळवून दत्तात्रय देशमुख विजयी झाले. कोतूळ गट आणि कोतूळ गणातील दोन एव्हीएम मशिन लाॅक झाल्याने तंत्रज्ञ येईपर्यंत मतदान यंत्रणेने वेळ घालवला. यामुळे कोतूळ गट गणातील मतमोजणीची आकडेवारी सायंकाळी तंत्रज्ञ आल्यावर जाहीर करण्यात आल्याने एकूणच निकाल जाहीर करण्यात खूप उशीर झाला. 

मतदानानंतर सर्व मतपेट्या पाॅलिटेक्निक काॅलेजच्या इमारतीत बंदिस्त करण्यात आल्या. या ठिकाणी आगीपासून सुरक्षितता बाळगण्यासाठी आठ दिवसापासून अगस्ती साखर कारखान्याचे कर्मचारी आग्निशामक बंब तैनात होता. आज मतमोजणी केंद्रावर बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अकोले पाॅलिटेक्निक काॅलेजच्या इमारतीत आज (गुरुवारी) सकाळी दहा वाजताच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून मतमोजणीला सुरूवात केली.

दुपारी साडेबारा वाजता पोस्टल मतदान मोजून झाले. अत्यंत धीम्या गतीने मतमोजणी सुरू होती. यामुळे मतमोजणीची प्रतिक्षा करणार्‍या कार्यकर्त्यांनी कोल्हार घोटी मार्गावर एकच गर्दी केली होती. सकाळपासूनच राष्ट्रवादी काॅग्रेसचे विरोधात लढणारे भाजप, शिवसेनेचे कार्यकर्ते तणावपूर्ण वातावरण वावरताना दिसत होते. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर राष्ट्रवादी, भाजप शिवसेनेच्या दोन गटातून मोठ्या प्रमाणावर वाद रंगल्याने राजकीय हालचाली झाल्याने कार्यकर्ते सावध पवित्रा घेत होते

असे आहेत गणाचे निकाल - 

समशेरपूर - रंजना मेंगाळ (शिवसेना - ५५५५)
खिरवरे - देवराम सामेरे (शिवसेना - ३७०३)
गणाेरे - नामदेव आंबरेेे (शिवसेना - ११२३४)
धुमाळवाडी - गोरख पथवे (राष्ट्रवादी - ४३१७)
धामणगाव - मारूती मेंगाळ (शिवसेना - ५८६०)
राजूर - दत्तात्रय देशमुख (भाजप - ३९१८)
वारंघुशी - अलका अवसरकर (भाजप - ४७८६)
मवेशी - विमल राऊत (भाजप - ३४७१)
सातेवाडी - दत्तात्रय बोऱ्हाडे (भाजप - ५४५४) 
कोतूळ - सारिका कडाळे (राष्ट्रवादी - ६८१९)
ब्राह्मणवाडा - सीताबाई गोंदके (राष्ट्रवादी - ५९७५)
देवठाण - माधवी जगधने (राष्ट्रवादी - ५८०६)

अकोले : एकूण गण १२ 
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: अकोले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेरीस Rating: 5 Reviewed By: DNA Live24