History of Maharashtra

मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र पित्याला जन्मठेपेची शिक्षा

संगमनेर । DNA Live24 - सावत्र बापाने केलेल्या अत्याचारामुळे गर्भवती राहून अल्पवयीन माता बनलेल्या मुलीला अखेर न्याय मिळाला आहे. याप्रकरणी घोटी शिळवंडी (ता. अकोले) येथील सावत्र बापाला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पीडित मुलगी ही आरोपीच्या दुसऱ्या पत्नीच्या पहिल्या पतीची मुलगी आहे.

ही मुलगी चार वर्षांची असल्यापासून सावत्र वडिलांकडे रहात होती. आरोपीचेही पहिले लग्न झालेले होते. त्याला आधीच्या पत्नीपासूनही काही अपत्ये आहेत. सातवीपर्यंत आश्रमशाळेत शिकलेल्या पीडितेला २०१३ मध्ये आरोपीने शाळेतून काढून सावत्र भावंडांचा सांभाळ करण्यासाठी घरी ठेवून घेतले. मे २०१३ मध्ये आरोपी दारु पिऊन घरी आला. त्याने पीडितेच्या आईला शिवीगाळ, मारहाण करत घराबाहेर काढले आणि दार लावत पीडितेवर निघृण अत्याचार केला. हा प्रकार आई किंवा अन्य कोणाला सांगितला, तर सर्वांना मारण्याची धमकी आरोपीने दिली. या घटनेमुळे मुलीला दिवस राहिले होते.

मुलीवर सावत्र पित्याकडून अत्याचार होत असल्याची माहिती राजूर पोलिसांना समजल्यावर तत्कालीन सहायक निरीक्षक राहुल पाटील यांनी तिची सुटका केली होती. तिला स्नेहालय संस्थेच्या ताब्यात देण्यात आले होते. याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली, त्यावेळी पीडिता सात महिन्यांची गरोदर होती. खटल्यादरम्यान स्नेहालयातच तिचे बाळंतपण झाले. न्यायालयात झालेल्या साक्षीदरम्यान मुलीची आई फितूर झाली. पीडितेला झालेल्या बाळाची डीएनए करण्यात आली होती. त्या अहवालाच्या आधारेच सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी प्रखरपणे बाजू मांडली.

या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश जे. एम. गांधी यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी काम पाहिले. सहायक सरकारी वकील वाकचौरे यांनी अनेक गोष्टी निदर्शनास आणून देत न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले. न्यायाधीश गांधी यांनी आरोपीला या गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अाहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget