History of Maharashtra

अॅड. रियाज पठाण हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू

श्रीरामपूर । DNA Live24 - नेवासा येथील अ‍ॅड. रियाज पठाण यांच्या खुन खटल्याच्या सुनावणीसाठी फिर्यादीच्या विनंतीवरुन राज्य सरकारने प्रसिध्द सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे. त्यासाठी अॅड. निकम हे प्रथमच श्रीरामपूरच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले. परंतु पोलिस आरोपींना न्यायालयात वेळेवर हजर करु न शकल्यामुळे या खटल्याची सुनावणी होवू शकली नाही. यापुढील सुनावणी आता ६ मार्चपासून होणार आहे.

नेवासा येथील अण्णा लष्करे खून प्रकरणातील आरोपींना ओळखण्याबाबत घुमजाव केल्याचा राग मनात धरुन एका अल्पवयीन मुलाला हाताशी धरुन अ‍ॅड. रियाज पठाण यांच्यावर तहसील व पोलीस ठाण्याच्या आवारातच देशी बनावटीच्या गावठी पिस्तुलने दोन गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर सर्व आरोपी पसार झाले. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येवून नंतर पोलिसांनी यातील दहा आरोपींना अटक केली होती. गोळ्या झाडणारा मुलगा हा अल्पवयीन नसल्याचे नंतर निष्पन्न झालेे. त्यामुळे त्यालाही नंतर अटक करण्यात आली.  प्रविण पोपट खरचंद, असे त्याचे नाव आहे.

प्रविण याच्यासह मोहन सुरेश लहामटे, आबाजी उर्फ भगवान रामेश्‍वर गाडे, चौरंगीनाथ गोरखनाथ लहामटे, पवन सोमनाथ नरुला, सचिन चंद्रकांत चव्हाण, सादिक बशीर  शेख, अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सोनकांबळे, विलास पोपट जिरे, व सोपान भगवान गाडे या १२ आरोपींचा या गुन्ह्यात समावेश आहे. त्यानंतर यातील दहा आरोपींना अटक करुन येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. यातील सादिक बशीर शेख हा आरोपी अगोदरच पसार होता. नंतर दुसरा आरोपी सोपान गाडे हा नगर येथून पळाला होता. तेव्हापासून हे दोघेही फरारच आहेत.

फिर्यादीच्या वतीने या प्रकरणात न्याय मिळावा, म्हणून राज्य शासनाने त्यांच्या अधिकाराखाली खास सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. गेल्या काही दिवसापासून हे प्रकरण नेवासा जिल्हा न्यायालयात चालू होते. पण काही महिन्यापासून हे प्रकरण श्रीरामपूर न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या खटल्यातील आरोपींची परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनाही वकील देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. विधी सेवा समितीच्यावतीने येथील अ‍ॅड. प्रसन्ना बिंगी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget