History of Maharashtra

तहसीलचा कनिष्ठ लिपिक लाच घेताना चतुर्भुज

नेवासे । DNA Live24 - वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर आरटीओ कार्यालयाकडून कारवाई होऊ नये यासाठी पत्र न पाठविण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्विकारताना नेवासा येथील तहसील कार्यालयातील लिपीकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले.

९ फेब्रुवारीला नेवासा तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपीक प्रदीप परशराम चव्हाण (वय 32) याने तक्रारदार यांच्याकडील वाळूच्या वाहनावर तहसीलचा दंड भरल्यानंतर आरटीओ कार्यालयाकडून कार्यवाही न होण्याकरीता आरटीओ कार्यालयास पत्र न पाठविण्यासाठी 7 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही लाच (500 रुपये मूल्याच्या 14 नोटा) प्रदीप चव्हाण तहसील कार्यालयाच्या आवारात तक्रारदार यांचेकडून पंच व साक्षीदारांसमक्ष स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

नाशिक येथील लाचलुचपतचे पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले व पोलीस उपअधिक्षक इरफान शेख यांचे मार्गदर्शनाखाली नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, सहाय्यक फौजदार काशिनाथ खराडे, हेडकॉन्स्टेबल सुनील पवार, वसंत वाव्हळ, राजेंद्र सावंत, पोलीस नाईक नितीन दराडे, एकनाथ आव्हाड, तन्वीर शेख, कॉन्स्टेबल प्रशांत जाधव, हुलगे यांनी ही कारवाई केली. याबाबत लालुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर विठ्ठल सावंत यांनी नेवासा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget