History of Maharashtra

चाईल्डलाईनमुळे चिमुरडा सुखरूप पोहोचला घरी

अहमदनगर । DNA Live24 - सिद्धीबाग, निलक्रांती चौक परिसरात बेवारस फिरत असलेल्या चार वर्षीय बालकाला चाईल्डलाईन सदस्यांच्या सतर्कतेमुळे सुखरूप घरी पाेहोचवण्यात आले आहे. चाईल्डलाईनचे सदस्य अलीम पठाण व संकेत होले यांना ही बालिका सापडली होती. त्यांनी त्याची विचारपूस करुन त्याला सुखरूप घरी पाेहोचवले. चाईल्डलाईनच्या या सतर्क कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक हेात आहे.

पठाण व होले यांनी बालकाची चौकशी केली असता तो काहीच बोलू शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तो फक्त हसत होता. नंतर चाईल्ड लाईनचे टिम मेंबर संकेत होले यांनी त्या बालकाला घेऊन निलक्रांती चौक, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रोड येथे त्याच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्या मुलाच्या पालकांचा काहीच तपास लागला नाही. तेथील लोकांना सांगितले कि जर कोणीही या मुलाविषयी विचारपूस केली तर त्यांना चाईल्डलाईन कार्यालयात पाठवण्याची विनंती केली.

नंतर त्या बालकाला चाईल्डलाईन कार्यालयात आणण्यात आले. काही वेळाने त्या बालकाची आई - वडील, काका, आजोबा चाईल्डलाईन कार्यालयात आले. या मुलाची आई रडत रडत मुलाची विचारपूस करू लागली. आपल्या मुलाला सुखरूप पाहून तिने चाईल्डलाईनचे आभार मानले. हरवलेल्या बालक सापडले, तर तत्काळ चाईल्डलाईनशी १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget