728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

आता करा उडत्या टॅक्सीने प्रवास!


दुबई । DNA Live24 - जगात दररोज नवनवीन कल्पना पुढे येत असून, त्यातलाच एक प्रकार हा उडत्या टॅक्सीचा. दुबईत आता विमानाप्रमाणेच टॅक्सीसुद्धा हवेत उडणार आहे. नुकतीच या अनोख्या स्वयंचलित एअर टॅक्सीची चाचणी करण्यात आली.


केवळ एका व्यक्तीसाठी असणारी ही टॅक्सी स्वयंचलित असून तुम्ही फक्त गुगल मॅपवर पोहोचण्याचा पत्ता टाकल्यानंतर, ही आपोआप सुरु होते. आणि 100 किलोमीटर प्रतीतासाच्या वेगानं तुम्हाला निश्चित स्थळी पोहचवते. 2030 पर्यंत दुबईतील बहुतांश भार या टॅक्सी सेवेवर टाकण्याचा दुबई सरकारचा मानस आहे. चीनी बनावटीची ही टॅक्सी येत्या जुलै महिन्यापर्यंत दुबईत लाँच होण्याचा अंदाज आहे. या टॅक्सीमुळं वेळेची, पैशाची बचत होईल शिवाय ट्रॅफिकमध्ये फसण्याचा त्रासही कमी होईल असं तज्ज्ञ सांगतात.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: आता करा उडत्या टॅक्सीने प्रवास! Rating: 5 Reviewed By: DNA Live24