728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

शेवगाव,जामखेड ग्रामपंचायतींमध्ये नोकर भरती घोटाळा


शेवगाव । जामखेड । DNA Live24 - ज्या शहरांच्या ठिकाणी पुर्वी ग्रामपंचायती होत्या, अशा शहरांचा विकास करण्यासाठी तेथे नगरपालिका व नगरपंचायत स्थापन करण्यात आल्या. मात्र ग्रामपंचायतीच्या काळात सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून नोकर भरती केली. तसेच कामगारांना किमान वेतन देऊन त्यांच्याकडून वेठबिगारीप्रमाणे काम करून घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांनी शासनाची फसवणुक केली असून या माजी कारभारींना शासनाने कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायत शेवगाव व जामखेड येथे माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी अनावश्यक नोकरभरती केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. ही भरती करताना कोणताही ठरावर घेतलेला नाही, तसेच वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे या अधिकार्‍यांनी शासनाच्या नियमांचे पालन केले दिसत नाही. विशेष म्हणजे जे कर्मचारी भरती केले आहे. अशा कर्मचार्‍यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार दिलेला नाही. अधिकारांचा गैरवापर करून ही नोकरभरती केल्याचे नोटीसमध्ये नमुद केलेले आहे. 

कामगारांना किमान वेतन देऊन वेठबिगारीप्रमाणे काम करून घेतल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले होते. त्यामुळे किमान वेतन कायद्याप्रमाणे माजी सरपंच व ग्रामसेवकाने शासनाची फसवणुक केली करुन मानवी हक्कांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा का दाखल करू नये असा प्रश्‍न सरपंच व ग्रामसेवक यांना केला असून या नोटिसांवर म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. असे न झाल्यास पुढील कारवाई काण्यात येईल असेही नोटिशीत म्हटले आहे.

जिल्ह्यात नगरपालिका व नगरपंचायत, ग्रामपंचायत, अंगणवाडी, परिचारीका अशा अनेक ठिकाणी राजकीय वरदहस्ताची नोकरभरती करण्यात आली आहे. कायदेशीर वेतन जास्त असताना त्यांना तीन ते चार हजार रूपयांमध्ये राबवून घेतले जाते. अशा कर्मचार्‍यांना किमान १८ हजार रुपये वेतन देऊन त्यांची सरकारी कर्मचारी म्हणून गणना करावी. या सर्व कर्मचार्‍यांच्या पगारांची चौकशी करावी. यात अनेकजण दोषी अढळून येतील, असे कामगार नेते अजित नवले यांचे म्हणणे आहे.

किमान वेतन व मानवी हक्क कायद्याप्रमाणे अक्षम कर्मचार्‍यांना किमान नऊ हजार वेतन, अर्धकुशल कर्मचार्‍यांना १० हजार रुपये तर कुशल कर्मचार्‍यांना ११ हजार रुपये वेतन देण्याची तरतुद आहे. मात्र शेवगाव व जामखेड येथे ७० ते ८० कर्मचार्‍यांचा अकृतीबंध असताना शेवगावात २५३ तर जामखेड येथे १५७ कर्मचारी भरण्यात आलेले आहे. यांना कमी पगार देऊन कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवकांना नोटीसा पाठविल्या असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात, असे जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन कापडनीस यांनी म्हटले आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: शेवगाव,जामखेड ग्रामपंचायतींमध्ये नोकर भरती घोटाळा Rating: 5 Reviewed By: DNA Live24