History of Maharashtra

नेवाशात मराठी विद्यापीठासाठी उपोषण

नेवासा l DNA Live24 - मराठीचे जन्मस्थान असलेल्या नेवासा येथे प्रस्तावित मराठी विद्यापीठ व्हावे व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा तसेच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनी ही घोषणा करावी या मागणीसाठी नेवासा तहसील कार्यालयासमोर झालेल्या लाक्षणिक उपोषणास सर्व स्तरातील मान्यवरांनी सहभाग घेऊन पाठींबा दिला.

संकृती युवा प्रतिष्ठान कुकाणा चे संस्थापक मुकुंद अभंग, नेवासा प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे, ग्रामीण साहित्यिक प्राध्यापक भाऊसाहेब सावंत यांनी नेवासा तहसील कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषण केले. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास पठाडे, मकरंद देशपांडे, पवन गरुड, सुधीर चव्हाण, शंकर नाबदे, संदीप वाखुरे, अशोक डहाळे, मोहन गायकवाड, अनिल गर्जे, कैलास शिंदे, शाम मापारी, नाना पवार आदी सदस्यांनी लाक्षणिक उपोषण केले.

या उपोषणाला आमदार बाळासाहेब मुरकुटे, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रशांत भाऊ गडाख, ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्थ शिवाजी महाराज देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक शिंदे, इंदिरा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखधान, रासपचे नेते शशिकांत मतकर, श्रावणबाळ संघटनेचे राजेंद्र निंबाळकर, जैन संघटनेचे मनोजकुमार भोसे, इंदिरा कॉंग्रेसचे गणेश जाधव, सुरेश डीके, वकील संघटनेचे पोपटराव नाईक, अड कचरू गवळी, अशोक तांबे, शोभा पातारे, सुधीर वैरागर, प्राध्यापक देविदास साळुंके, शिवसेनेचे भाऊसाहेब वाघ, राजेंद्र काळे, नितीन जगताप, सचिन दिनकर, अमृत पाटील, पप्पू देशमुख, बाबासाहेब लबडे, राजेंद्र मुत्था, शेख रहेमान, एकनाथ भगत, राजेंद्र मापारी, सुदाम कदम, राऊसाहेब फुलारी, सुनील धायजे, निखिल शिंगी, आप्पासाहेब गायकवाड यांनी भेट देऊन पाठींबा दिला.

मराठी वाचक वारकरी, साहित्यिक यांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा येथे विद्यापीठ व्हावे म्हणून यूजीसी समितीने पाहणी संदर्भात महाराष्ट्र शासनाने केंद्रीय मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा. नेवासा येथे महसूल व वनविभागाची पुरेशी जागा उपलब्ध आहे. जवळच औरंगाबाद व शिर्डी विमानतळ आहे. रहदारीसाठी औरंगाबाद-पुणे महामार्ग आहे व नेवासे हे महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण आहे. असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रेस क्लब व संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांकडे पहिल्याच अधिवेशनाच्या वेळी मागणी केलेली आहे व याचा पाठपुरावा करत असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर व पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. त्यांनी नेवासकरांच्या भावना शासनदरबारी कळवू असे आश्वासन दिले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget