History of Maharashtra

कोपरगाव तालुक्यात अवैध दारुचा सुळसुळाट

कोपरगाव । DNA Live24 - नगर तालुक्यातील पांगरमल गावामध्ये बनावट दारूमुळे ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे पोलिस प्रशासन राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागे झाले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी अनधिकृतपणे सर्रास विकल्या जाणाऱ्या दारुच्या अवैध धंद्याविरोधात संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम राबवली आहे. मात्र, कोपरगाव शहरासह तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी गावठी दारुचे अड्डे मटका, जुगार सर्रासपणे चालू आहे.

कोपरगाव शहरामध्ये प्रामुख्याने खडकी, गोरोबानगर, गजानननगर, संजयनगर, सुभाषनगर, खाटिक गल्ली आदी भागांमध्ये, तर तालुक्यातील संवत्सर, मनई, रवंद्याच्या काटवनामध्ये, माहेगाव, कोळपेवाडी, चासनळी, धामोरी आदी गावांमध्ये गावठी दारुचा व्यवसाय तेजीत आहे. शहरामध्ये अनेक विना परवाना हॉटेलमधे देखील राजरोसपणे दारुची मोठी विक्री चालते. आर्थिक हितसंबंधामुळे काहींच्या दादागिरीमुळे छुप्या पद्धतीने चालणाऱ्या या अवैध धंद्यांबाबत फारसे कोणी तोंड उघडत नाही.

कोपरगावात अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्यांची मात्र मोठी चांदी यामुळे होत आहे. अवैधपणे चाललेल्या या दारू धंद्यावर शहर तालुका पोलिस निरीक्षकांनी वेळीच कारवाई करून हा व्यवसाय करणाऱ्यांवर तसेच या व्यवसायाची पाठराखण करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या अवैध धंद्यांबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी देखील लक्ष घालावे; अन्यथा पुढील काळात पांगरमलची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती कोपरगावच्या नागरिकांनी व्यक्त केली.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget