History of Maharashtra

आत्मा मलिकने उमटवला राज्यभर ठसा - चव्हाण

कोपरगाव । DNA Live24 - आत्मा मालिक शैक्षणिक संकुल शिक्षणपद्धतीबरोबरच अद्ययावत शिक्षण देण्याचे कार्यही करत आहे. या संकुलाने गुणवत्तेमध्ये उत्तुंग प्रगती केल्याने अल्पावधीत महाराष्ट्राभर आपला ठसा उमटवला आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थी घडवणारे एकमेव गुरुकुल आहे, असे कल्याणचे बांधकाम व्यावसायिक मिलिंद चव्हाण यांनी प्रतिपादन केले. 

चव्हाण हे ओम गुरुदेव माध्यमिक गुरुकुलाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सौभाग्यवती याच गुरुकुलाच्या माजी विद्यार्थिनी सरिता चव्हाण तसेच एसएसजीएम महाविद्यालयाचे प्रा. एम. एस. देवकर, प्राचार्य निरंजन डांगे, विभागप्रमुख रमेश कालेकर, मीनाक्षी चव्हाण, रवींद्र देठे, बाळा काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget