History of Maharashtra

'मलंग लॉस्ट इन म्युझिक'मध्ये नगरकर मंत्रमुग्ध


अहमदनगर । DNA Live24 - संगीत व गायनाने व्यक्ती परमात्म्याशी लीन होतो. पुर्वी शहरात संगीत शिक्षणासाठी कोणतीही प्रशिक्षण अ‍ॅकॅडमी नव्हती. आवड असून देखील अनेक कलाकारांना संगीताचे ज्ञान मिळणे कठिण होते. आज रिदम म्युझिक अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून मुलांना विविध वाद्य शिकण्यास संधी निर्माण झाली आहे. याद्वारे अनेक कलाकार घडणार असल्याची अपेक्षा चित्रपट क्षेत्रातील नॅशनल अवॉर्ड विजेते कामोद खराडे यांनी व्यक्त केली.

अजित सिंग्ज रिदम म्युझिक अ‍ॅकॅडमीच्या वतीने माऊली सभागृहात आयोजित मलंग लॉस्ट इन म्युझिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अजितसिंह वधवा, हरजितसिंह वधवा, गायक अंगद गायकवाड, तबला वादक संजय हिंगणे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, देवेंद्रसिंह वधवा, अमरजितसिंह वधवा, संदिप आहुजा, अनीश आहुजा, मनप्रितसिंह वधवा, दलजितसिंह वधवा, प्रिटी ओबेरॉय,राजेंद्र चावला, बलजितसिंह वधवा, जसमितसिंह वधवा, सनी वधवा, डॉ. हरमितसिंह कथूरिया उपस्थित होते.

प्रास्ताविकात अजितसिंह वधवा यांनी शहर व ग्रामीण भागातील नवोदीत कलाकारांना म्युझिक क्षेत्रात व्यासपिठ निर्माण करण्यासाठी या अ‍ॅकॅडमीची स्थापना केल्याचे सांगितले. संगीत ज्ञानाची माहिती देवून, संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी या वर्षीपासून एक्सलन्स अवॉर्ड सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. शालेय वयातच शास्रीय संगीत क्षेत्रात नगरचे नांव देशपातळीवर नेणाऱ्या अंजली व नंदिनी गायकवाड या बहिणींना यंदाचा एक्सलन्स अवॉर्ड कामोद खराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

संगीत शिक्षक संजय हिंगने व अंगद गायकवाड यांचा मोहनसिंह व जसबीरकौर वधवा यांनी सत्कार केला. अ‍ॅकेडमीच्या ७० विद्यार्थ्यांनी रॉक परफॉर्मन्स, ड्रम सोलो, पियानो सोलो, तबला, गायन,गिटार वाद्यांवर कला सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजित गवारे, स्नेहल खंडागळे, प्रीतम गायकवाड, अनिरुध्द देशमुख, शुभम कार्ले, हर्षल नागपुरे, योगेश कोथंबीरे, पराग लोखंडे प्रयत्नशील होते. सुत्रसंचलन अनिकेत मुनोत यांनी केले. आभार हरजितसिंग वधवा यांनी मानले.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget