History of Maharashtra

कर्जतला ७० टक्के मतदान

nagarzp election 2017 voting at Karjat

कर्जत । DNA Live24 - तालुक्यात 4 जिल्हा परिषद गट व 8 पंचायत समिती गणासाठी 70.51 टक्के मतदान झाले. मतदान झाल्यानंतर आता निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.

कर्जत तालुक्यात यावेळची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दोन गट राखीव असतानाही कमालीची चुरशीची झाली आहे. आता सर्वांना निकालाचे वेध लागले आहेत. कोणत्या गटात कोण बाजी मारणार याचे कवित्व आता सुरू झाले आहे. तालुक्यात एकूण 1 लाख 67 हजार 371 मतदार आहेत. यामध्ये  88 हजार 973  पुरूष मतदार तर स्त्री मतदार 78 हजार 397 आहेत.

यासाठी तालुक्यात 197 मतदान केंद्र होते . यामध्ये 1 लाख 18 हजार 16 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला आहे. यामध्ये पुरूष मतदारांनी 64 हजार 297 व स्त्री मतदार 53 हजार 719 यांचा समावेश आहे. मतमोजणी 23 तारखेला तहसील कार्यालयामध्ये होणार आहे 
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget