History of Maharashtra

जिद्द व मेहनतीवर विश्वास ठेवल्यास यश निश्चित - नरसिंग यादव

अहमदनगर । DNA Live24  - अडचणी सगळ्यांना येतात. भारतात जे आहे त्यापेक्षा आपल्याकडे जे नाही त्याच्यावरच बोलत राहतात. कमळ चिखलातच उमलते. आपल्यातील जिद्द व मेहनतीवर विश्‍वास ठेवल्यास यश मिळते. न्यु आर्टस प्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाने खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा पुरविल्यास चांगले खेळाडू घडतील, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू नरसिंग यादव यांनी केले. न्यु आर्टस महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

यावेळी आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू अंजली देवकर-वल्लाकट्टी, आदर्शगाव प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, पत्रकार बाळ बोठे, संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव जी. डी. खानदेशे, खजिनदार रामचंद्र दरे, विश्‍वस्त सीताराम खिलारी, प्राचार्य डॉ. भास्कर झावरे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. शरद मगर, प्रा. सुधाकर सुंबे आदी उपस्थित होते.

अंजली देवकर म्हणाल्या, महाविद्यालयीन जीवनात मैदानावर अनेक गोष्टी शिकता येतात. त्याचा जीवनात उपयोग होतो. जीवनात अनेक अडचणी येतात. खेळाडू मैदानावरच अशा अडचणींना तोंड देण्यास शिकतो. स्वतःवर विश्‍वास ठेवल्यास यश निश्‍चित मिळते. युवकांनी "बार'कडे वळण्यापेक्षा "डबलबार'कडे वळून आयुष्य घडवावे. मन, मनगट, मेंदू यांचा समन्वय म्हणजे कुस्ती होय. ज्या खेळाडूत यश अपयश पचविण्याची ताकद असते तो कधीच आत्महत्या करू शकत नाही.

शरीरसंपत्ती हीच खरी संपत्ती आहे. आई-वडील आणि गुरू यांच्यावर नेहमीच श्रद्धा असावी. असे त्या यावेळी म्हणाल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात पोपटराव पवार यांनी सांगितले की, मैदानावरचे खडतर जीवन आणि त्यातून अंगीकरलेली सामाजिकता यामुळेच मी आज देशभर फिरत आहे. काळ बदललेला आहे. बदलत्या काळाचे आव्हाने आजच्या युवा खेळाडूंनी स्वीकारावीत. यावेळी नंदकुमार झावरे, सीताराम खिलारी यांची भाषणे झाली.

यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावरील स्पर्धांतील गुणवंत खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. प्रारंभी प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांनी महाविद्यालयाच्या सर्व विभागांची माहिती दिली. प्रास्तविक प्रा. अर्चना रोहकले यांनी केले. वरिष्ठ क्रीडा विभागाचे अहवाल वाचन प्रा. धन्यकुमार हराळ तर कनिष्ठ विभागाचे अहवाल वाचन प्रा. सुधाकर सुंबे यांनी केले. आभार प्रा. प्रतिमा जोगदंड यांनी मानले.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget