History of Maharashtra

पांगरमल दारुकांड - दादा वाणीसह चौघांच्या पोलिस कोठडीत वाढ

अहमदनगर । DNA Live24 - पांगरमल (ता. नगर) येथील बनावट दारुकांडात बळी गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यातील आरोपी दादा वाणी याच्यासह चौघा जणांच्या पोलिस कोठडीत वाढ झाली आहे. यामध्ये पंचायत समिती सदस्य मंगल आव्हाड, तिचा पती महादेव आव्हाड व भरत जोशी यांचा समावेश आहे.

कुख्यात मद्यतस्कर दादा वाणी, शिवसेनेची पंचायत समिती सदस्य मंगल आव्हाड, तिचा पती महादेव आव्हाड, भरत जोशी, मोहन दुगल व संदीप दुगल यांची पोलिस कोठडी संपल्याने सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांनी वाणी, आव्हाड दाम्पत्य व जोशीची पोलिस कोठडी २ मार्चपर्यंत वाढवली. तर मोहन व संदीप दुगल यांना मात्र न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर सुरूवातीलाच पांगरमलमधून दारुचे काही बॉक्स जप्त केले होते. मात्र, त्यावेही अटक केलेल्या आरोपी भीमराज आव्हाडने कबुली दिली होती की, आम्ही तेथे जास्त बॉक्स नेलेले होते. जप्त बॉक्सची संख्या कमी असल्याने पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली. मात्र सध्या पोलिस कोठडीत असलेले आरोपी त्याबद्दल काहीच सांगत नाहीत. त्यामुळे उर्वरित बॉक्स आव्हाड दाम्पत्याने इतरत्र फेकून दिल्याचे, किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी लपवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या बॉक्सच्या शोधासाठी दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी तपासी अधिकाऱ्यांनी केली होती.

धुळ्याचा कुख्यात मद्यतस्कर दादा वाणी याच्याविरुद्ध आतापर्यंत अकरा गुन्ह्यांची नोंद आहे, असे तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. आश्चर्य म्हणजे नगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याच्या पंधरा दिवसांपूर्वीच धुळ्याच्या उत्पादन शुल्क विभागाने त्याच्या अवैध गोदामावर छापा टाकला होता. या छाप्यात अवैध दारुचे सुमारे शंभर बॅरल, ड्रम जप्त करण्यात आले. तरीही त्याच्या धंद्यात खंड पडलेला नव्हता. छापे पडूनही त्याचा धंदा सुरूच असल्याचे तपासात समोर अाले आहे.

कुख्यात मद्यतस्तर दादा वाणीला पोलिसांनी धुळ्यातून ताब्यात घेतले. या वाणीचा धुळ्यात आलिशान बंगला आहे. वाणीची संपत्ती पाहून पोलिसांचेही डोळे दिपले होते. त्याच्या राहत्या बंगल्यात एक वातानुकुलित केबिन आहे. तो साईबाबांचा मोठा भक्त असून केबिनमध्ये साईबाबांची एक माेठी फ्रेम आहे. त्यानेच नगरच्या आरोपींना अल्कोहोल व स्पिरिट पुरवले होते. हा माल तो गोव्यातून आणायचा. तो राज्यभरात बहुतांश ठिकाणी मद्यतस्करी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget