History of Maharashtra

पाथर्डी नगरपालिकेच्या ८५ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

पाथर्डी । DNA Live24 - शहरातील पालिकेची मालकी असलेल्या राखीव भुखडांचा (खुल्या जागा) नगरपालिका विकास करणार आहे. महिलांसाठी रामगीरबाबा टेकडीच्या परिसरात ग्रीन जीम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे घनकचरा व्यवस्थापन करुन त्याद्वारे पालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच शहराला पाणी, रस्ते, भुयारी गटारी व वीज या सुविधा प्राधान्याने पुरविण्याचा निर्णय घेवुन ८५ कोटी रुपयाचा पालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

नगरपालिकेच्या सभागृहात पालिकेचे अध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले. उपनगराध्यक्ष बजरंग घोडके व सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. नगरपालिकेच्या अर्थसंकल्प मंजुरीसाठीच्या या महत्वाच्या बैठकीत शहाराच्या विकासाबाबत महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. शहराच्या विकास आऱाखडा तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संस्थेचे काम असमाधानकारक असल्याने त्या संस्थेकडील काम काढुन घेण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये नव्याने काम करुन पालिकेचे उत्पन्न वाढविणे. भांडवली मुल्यांवर घरपट्टीची नव्याने आकारणी करणे. शहरातील विजेचे दिवे बसविणे, माधवराव निर्‍हाळी सभागृहाच्या रिकाम्या जागेत दुचाकी वाहनांची पार्कींग व्यवस्था करणे. भुयारी गटारी, रस्ते, तिर्थक्षेत्र विकास योजनेचे काम करणे असे महत्वपुर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आले. पालिकेने तयार केलेल्या अर्थसकंल्पामधे रमेश गोरे, बंडु बोरुडे, मंगल कोकाटे, नंदकुमार शेळके, बजरंग घोडके यांनी सुचना केल्या.

नामेदव लबडे, चंदा भापकर यांनी पालिकेची कामे करतांना संबधित नगरसेवकाला कल्पना द्यावी अशा सुचना केल्या. महेश बोरुडे यांनी महिलांसाठीची ग्रीनजीम ही संकल्पना मांडली. यावेळी दिपाली बंग, संगिता गटाणी, शारदा हंडाळ, दुर्गा भगत, असिया शेख, सुनिता बुचकुल, प्रसाद आव्हाड, प्रविण राजगुरु, अनिल बोरुडे, सविता डोमकावळे उपस्थित होते. शहरात पालिकेच्या मालकीचे ५२ खुले भुंखड आहेत. त्यावरील अतिक्रमण काढुन त्यांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मुख्याधिकारी डॉ. वसुधा कुरणावळ यांनी सांगितले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget