History of Maharashtra

शेवगावचा सप्ताह थेट गिनीज बुकात

शेवगाव । DNA Live24 - शहरात श्री सदगुरु जोग महाराज संस्थापित, वारकरी शिक्षण संस्था, श्रीक्षेत्र आळंदी शताब्दी महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित सप्ताहाची सांगता लाखों भाविकांच्या उपस्थित झाली. या सप्ताहात तीन विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र लंडनस्थित एका संस्थेने मान्यवरांच्या उपस्थितीत सप्ताहाचे नियंत्रक राम महाराज झिंजुर्के यांच्याकडे सुपुर्त केले.

सांगता सोहळ्यासाठी शिवाजी महाराज देशमुख, आदीनाथ महाराज शास्री, उध्दव महाराज नेवासेकर, कृष्णदेव महाराज काळे, रामगिरी महाराज येळीकर, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, प्रशांत गडाख, पत्रकार डॉ. बाळ ज. बोठे, उत्तमराव करपे, जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे, राजश्रीताई घुले, सभापती मंगलताई काटे, बापुसाहेब भोसले, काकासाहेब नरवडे, दिलीपराव लांडे, शिवशंकर राजळे, दिनेश लव्हाट, माधव काटे, रामनाथ राजपुरे, मोहनराव देशमुख, अंबादास कळमकर, बबनराव भुसारी उपस्थित होते. उद्धव महाराज नेवासेकर यांनी काल्याचे कीर्तनातुन लाखो भाविकांना उपदेश केला.

विश्वविक्रमाची सुरुवात पसायदानाने सहभागी झालेल्या एक लाख नऊ हजार आठशे भाविकांच्या उपस्थितीत झाली. तर एकाचवेळी २५ हजार ८०० लोकांचे नेत्रदान करण्याचे संमत्तीपत्रे सुपुर्त करण्यात आली. शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यातील महिलांनी तयार केलेल्या पुरणपोळीचा प्रसादाचा आस्वाद १ लाख भाविकांनी घेतला. या तिन्ही विक्रम जाहीर करत प्रमाणपत्र संबंधित संस्थेच्या प्रतिनिधीनी मंचावर दिली. या सप्ताह परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य कृषी व विज्ञान प्रदर्शनास उपस्थित मान्यवरांनी भेट देऊन आयोजक बबनराव म्हस्के यांचे कौतुक केले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget