History of Maharashtra

पाथर्डी तालुक्यात शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा

पाथर्डी। DNA Live24 - तालुक्यातील मोहोजदेवढे (बहिरवाडी) येथील सहा शालेय विद्यार्थ्यांनी बिलायताच्या बियामधील गर खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आहे. यापैकी तिघा विद्यार्थ्यांना गावातील खासगी, तर तिघा विद्यार्थ्यांना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाहे. या विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी सकाळी बहिरवाडी येथील काही शालेय विद्यार्थी सकाळी शाळेत जाण्यापूर्वी घराशेजारी खेळत होते. साईनाथ नाना फरतारे (७), गहिनीनाथ दादा फरतारे (१२), वैभव पोपट कराळे (१०), कृष्णा दादा फरतारे (५), गीता दादा फरतारे (९), साधना बंडू लोखंडे (७) यांनी भुईमुगाच्या शेंगा समजून बिलायताच्या बियामधील गरच खाल्ला. त्यामुळे या मुलांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. तर काही विद्यार्थ्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यामुळे इतर मुले घाबरली.

कृष्णा फरतारे याचे आजोबा यमाजी शेजारी शेतात काम करीत होते. त्यांनी कृष्णाला सतत उलट्या येत असल्याचे पाहिले. त्यामुळे त्याच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी मुलांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले. ‘बिलायताच्या बिया खाल्ल्याने मुलांना त्रास झाला आहे. त्यांची प्रकृती आता हळूहळू सुधारते आहे. तरीही काही काळ त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येईल,’ असे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा खेडकर यांनी सांगितले आहे. आता या मुलांची प्रकृती सुधारत असल्याचे त्या म्हणाल्या.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget