History of Maharashtra

शिर्डी देवस्थान अध्यक्ष, कर्मचाऱ्यांची उद्या महत्वाची बैठक

राहाता । DNA Live24 - शिर्डी देवस्थान संस्थानच्या रोजंदारी कर्मचार्‍यांचा प्रश्‍न भाजपाच सोडविणार असल्याचा दावा भाजपाचे राहाता तालुकाअध्यक्ष नंदकुमार जेजुरकर यांनी केला आहे. त्यासाठी २४ फेब्रुवारीला साईबाबा संस्थानचे अध्यक्ष व कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी संस्थांनचे विश्वस्त सचिन तांबे हे समन्वयकाची भुमिका पार पाडणार आहेत, असे प्रसिद्धीपत्रक जेजुरकर व जिल्हा सरचिटनीस संजय सोमवंशी यांनी काढले आहे.

अनेक वर्षापासुन साईबाबा संस्थानची सुत्रे ताब्यात असलेल्यांकडून संस्थानच्या रोजंदारी कर्मचार्‍यांना कायमच झुलवत ठेवले. आता कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्‍नाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे भारतीय जनता पक्षाचे धोरण आहे. रोजंदारी कर्मचार्‍यांना वार्‍यावर न सोडता त्यांना दिलासा देणारा निर्णय भाजपा लवकरच घेणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आधीच्या सत्ताधार्‍यांनी कर्मचार्‍यांनाच नव्हे तर संपुर्ण संस्थानलाच वेठीस धरल्यामुळे संस्थानच्या प्रगतीत मोठा अडसर निर्माण झाला होता. सहा महिन्यापुर्वी संस्थांनवर नव्याने विश्वस्त मंडळाने विश्वस्त पदाची सुत्रे हाती घेतल्यापासुन अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन विकास पर्व सुरू केले.

आचार संहिता संपताच पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी हे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालणार असून लवकरच कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांची सोडवणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतले जातील. सचिन तांबे हे संस्थान व कंत्राटी कर्मचारी यांच्यात समन्वयकाची भुमिका बजावणार अाहेत. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे व कर्मचारी यांच्यात २४ फेब्रुवारीला संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे विश्वस्त सचिन तांबे यांनी सांगितले. या बैठकीला भाजपाचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget