History of Maharashtra

पाथर्डीत रॅली, चित्ररथ, व्याख्यानांनी शिवजयंती साजरी

पाथर्डी । DNA Live24 - शासकीय शिवजयंतीचा उत्सव शहर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मिरवणुका, नाटिका, मोटारसायकल रॅली, चित्ररथ, व्याख्याते, विद्यार्थ्यांनी रॅली आदी कार्यक्रमांनी रात्री उशिरापर्यंत जयंतीचा उत्सव रंगला. अनेक वर्षांनंतर एवढ्या भव्य प्रमाणात विविध मंडळांकडून कार्यक्रम करण्यात आले.  श्री तिलोक जैन विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय, नगरसेवक महेश बोरुडे मित्र मंडळ, कसबा व्यायाम शाळा आदी प्रमुख संयोजकांनी भव्य प्रमाणात उत्सवाचे आयोजन केले.

श्रीतिलोक जैन विद्यालयात कार्यक्रम चित्रपट कलावंत प्रशांत नेटके, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, संस्थेचे सचिव सतीश गुगळे, प्राचार्य बबन फुंदे, सुभाष खेडकर संजय कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत शिवजयंतीवर आधारित विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तब्बल तीन तास रंगला. प्रास्ताविक नीलिमा शेटे, सूत्रसंचालन साक्षी पारखे प्रतीक पाखरे यांनी केले. आभार प्रशांत लंघे यांनी मानले.

शाहीर भारत गाडेकर, सुनील मरकड बिपीन खंडागळे या शिक्षकांच्या पुढाकाराने सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. वृत्त छायाचित्रकार सुनील शेवाळे यांच्या शिवचरित्रावर आधारित फोटो प्रदर्शनाचे उद््घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड मित्र मंडळाच्या वतीने रॅली काढून कसबा विभागातील शिवपुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

सायंकाळी महेश बोरुडे मित्र मंडळाच्या पुढाकाराने शहरातून मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यातील मोहरी येथील शिक्षक पोपट फुंदे यांनी शिवजयंतीनिमित्त प्रतिमेला अभिवादन करून गावातील गरीब मुस्लिम समाज बांधव अहमदभाई शेख यांना पूर्ण पोषाख, शिवप्रतिमा भेट देऊन जयंती साजरी केली. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजबांधव सर्व जाती, धर्माचे लोक उपस्थित होते. 
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget