728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

श्रीधर फडकेंच्या गीतरामायणात नगरकर रसिक मंत्रमुग्ध

अहमदनगर । DNA Live24 - पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री मार्कंडेय विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ज्येष्ठ संगीतकार तथा गायक श्रीधर फडके यांच्या गीतरामायण कार्यक्रमात उपस्थित रसिक श्रोते भारावले. गांधी मैदानात रंगलेल्या या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने उपस्थित राहून नगरकरांनी दाद दिली. श्रीधर फडके यांनी गीतरामायणातील एकाहून एक सरस सुरेल स्वराविष्कारात गीत सादर करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी शरद क्यादर, रमेश सब्बन, विलास पेद्राम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, अशोक वासलवार, प्रसिध्द गायक पवन नाईक, डॉ. रत्ना बल्लाळ, बाळकृष्ण सिद्दम, नगरसेविका वीणा बोज्जा, अरविंद चन्ना, बाळकृष्ण गोटीपामूल, शालिनी गोसकी, मुख्याध्यापक रावसाहेब क्षेत्रे, पांडुरंग गोने, श्रीनिवास मुत्त्याल, उमेश वासलवार, संजय गंभीरे, पर्यवेक्षक दिपक रामदिन, अंजली देवकर, राजेंद्र दासरी, सरोजनी रच्चा, विठ्ठल मंगलारम, अनिल आचार्य, संभाजी जगदाळे, मीना परदेशी उपस्थित होते.

प्रास्ताविकात बाळकृष्ण सिद्दम यांनी श्री मार्कंडेय विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाचा विकासात्मक आढावा घेतला. पाहुण्यांचे स्वागत शरद क्यादर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात फडके यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. कविवर्य ग. दि. माडगुळकर रचित, प्रसिध्द गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्या सुमधुर कंठातून अजरामर झालेला गीतरामायण कार्यक्रमातील 56 गीतांच्या आठवणींना उजाळा देत, यातील विलक्षण प्रतिभा, सुरांचा अविष्कार असलेल्या गीतांची माहिती फडके यांनी दिली.

श्रीराम पुत्रांना सांगणारे वाल्मिकी ऋषी, रघु राजाच्या नगरी जावून गा बाळांनो श्रीरामायण.... या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. गीतरामायण कार्यक्रमामध्ये श्रीधर फडके यांना अतुल माळी (सिंथेसायझर), तुषार आंग्रे (तबला वादक), व्यंकटेश कुलकर्णी (सहवादक), सुकन्या जोशी (निवेदिका), सहगायक- अनुजा कुलकर्णी, प्राची पाठक, अपर्णा बालटे, देवयानी झरेकर, अमृता बेडेकर, संगीता मेस्त्री, संकेत रहाडे, ओंकार देऊळगावकर, पंकज कुलकर्णी, संज्योत गिरी यांनी साथ दिली.

उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक रावसाहेब क्षेत्रे यांनी मानले. कार्यक्रमास श्री मार्कंडेय विद्यालयाचे आजी-माजी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गीतांमधून रामाची थोरवी - गीतरामायणास दशरथा घे हे पसायदान... या गीताने प्रारंभ झाले. राम जन्मला ग सखे राम जन्मला या गीताने संपुर्ण वातावरण प्रफुल्लित झाले. वसंत बहार राग मधील ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा... हे गीत त्यांनी सादर केले. चला जनका चला पहावयास जनकाची मिथीया..., राम चरण तुझे लागले आज मी शाप मुक्त झाले... या गीताने त्यांनी भगवान रामची थोरवी सांगितली. सितेच्या स्वयंवर मध्ये भगवान श्रीरामांनी शिवधनुष्य वाकवल्याची घटना त्यांनी गीतामधून जिवंत केली.
श्राेत्यांना खिळवून ठेवले - स्वयंवर झाले सीतेचे... या गीताने श्रोत्यांना खिळवून ठेवले. वनवासाला प्रभू श्रीराम निघालेल्या प्रसंगी सादर करण्यात आलेले गीत थांब सुमंता थांबवीरे रथ... तसेच माता न तू वैरणी... या गीतांनी त्यांनी भरत चा संताप व्यक्त करुन रसिक श्रोत्यांच्या ह्रद्याचा ठाव घेतला. भैरवी चाल, पहाडी गोरख कल्याण रागद्वारे त्यांनी प्रभु मज एकच वर द्यावा हे गीत सादर केले. सीता लक्ष्मणाचा संवाद, मज सांग लक्ष्मणा जावू कुठे... या गीताने वातावरण गंभीर व भावूक झाले होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: श्रीधर फडकेंच्या गीतरामायणात नगरकर रसिक मंत्रमुग्ध Rating: 5 Reviewed By: DNA Live24