History of Maharashtra

संगमनेरला शनिवारी डॉ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान

संगमनेर । DNA Live24 - मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संगमनेरमध्ये होत असलेल्या बाबासाहेब पुरंदरेलिखित जाणता राजा या महानाट्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या महानाट्याच्या निमित्ताने शनिवारी (२५ फेब्रुवारी) संगमनेरमध्ये शिवछत्रपतींच्या जीवनावरील गडकोटांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आणि शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. शिवरत्न शेटे यांचे ‘शिवचरित्रपर’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. संजय मालपाणी यांनी दिली आहे.

शिवप्रेमी नागरिकांसाठी गीता परिवार आणि राजस्थान युवक मंडळाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मार्च ते मार्चपर्यंत संगमनेरमध्ये जाणता राजा मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास ‘जाणता राजा’ या महानाट्यातून आठवडाभर उलगडणार आहे. त्या दृष्टीने शिवरायांचा पराक्रमी इतिहास आजच्या पिढीसमोर यावा यासाठी गडकोटांचे छायाचित्र प्रदर्शन, शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि शिवचरित्रपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

मालपाणी लॉन्स येथे हे प्रदर्शन आणि व्याख्यान होणार आहे. संगमनेरमधील दुर्गमित्र श्रीकांत कासट यांनी गेल्या ३५ वर्षांच्या काळात राज्यातील दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकंती करत शिवरायांच्या स्वराज्यातील गडकोटांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपले आहे. त्यातील शिवरायांच्या पराक्रमाशी, त्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या निवडक असलेल्या गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचा या प्रदर्शनामध्ये समावेश आहे. शनिवारी डॉ. शिवरत्न शेटे यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता या प्रदर्शनाचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर शेटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी रात्रीपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य खुले राहणार आहे. या उपक्रमासाठी संगमनेरकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले आहे. संगमनेरसह परिसरातील रसिकांना या व्याख्यानाची उत्सुकता लागली आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget