History of Maharashtra

बनावट दारू बनवणाऱ्यांवर कडक कारवाई करा - वकिलांची मागणी

संगमनेर ।  DNA Live24 - नगर तालुक्यातील पांगरमल येथील विषारी दारू प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी संगमनेर येथील वकील निशा शिवुरकर यांच्यासह महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अॅड. शिवुरकर, गर्भलिंग चिकित्सा कायदा अंमलबजावणी कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे, प्रा. शिवाजी गायकवाड, अॅड. अनिल शिंदे, शांताराम गोसावी, बेबी जाधव, पद्मा नवले, निर्मला गाडेकर, अॅड. मीनल देशमुख आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत एक लेखी निवेदन पाठवले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा शल्य चिकित्सक सखाहारी सोनवणे यांच्याविरोधात कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. जिल्ह्यात बनावट िवषारी दारू निर्माण होत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा दारुबंदी विभागाचे अधिकारी पोलिस अधीक्षकांची चौकशी करण्यात यावी. 

ज्या उमेदवारांनी या दारुचे वाटप केले त्या उमेदवारांनाही आरोपी करण्यात यावे, यापुढील काळात दारूविक्रेते आणि दारू पिणाऱ्यांना उमेदवारीसाठी अपात्र ठरवावे. तालुका जिल्हास्तरीय सर्व दारुबंदी समितीच्या नियमित बैठका घेऊन दारुबंदीसाठी प्रभावीपणे काम केले जावे. यासाठी आम्हीदेखील शासनाला सहकार्य करण्यास तयार आहोत. दारुबंदीसाठी अधिकारांचा वापर केला जावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget