History of Maharashtra

रविवारी खुल्या स्केटींग रोड रेस स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर । DNA Live24 - टिम टॉपर्स स्केटिंग अ‍ॅकॅडमीच्या वतीने आयोजित खुल्या स्केटिंग रोड रेसचा शुभारंभ रविवार दि. 26 फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता होणार आहे. केडगाव देवी रोड येथे होणाऱ्या स्पर्धेत खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अ‍ॅकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.

ही स्पर्धा टेनासिटी, क्वॉड, इनलाईन प्रकारामध्ये होणार आहे. स्पर्धेसाठी वय वर्ष ४,  ६, ८, १०, १२ व खुला वयोगट ठेवण्यात आले असून, १०० मी., १५० मी., २०० मी. तसेच ५०० मी. मध्ये स्पर्धा संपन्न होणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अ‍ॅकॅडमीचे खजिनदार अ‍ॅड. आसिफ शेख, प्रशिक्षक प्रशांत पाटोळे, सागर भिंगारदिवे परिश्रम घेत आहे. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी प्रशांत पाटोळे 8087870899 व सागर भिंगारदिवे 7709890099 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget