History of Maharashtra

कोंडेगव्हाणला दरोडेखोरांच्या हल्ल्यात तिघे जखमी

श्रीगोंदा । DNA Live24 - श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण येथे शुक्रवारी पहाटे पूर्वी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले. या घटनेत एक लाख रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी चाैघा अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.

याप्रकरणी गणेश पांडुरंग डोंगरे (कोंडेगव्हाण) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डोंगरे यांच्या घरासमोरील अंगणात त्यांचे आई-वडील झोपले असता चार ते पाच चोरट्यांनी लोखंडी खांब लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या आई-वडिलांवर हल्ला चढवला. यात पांडुरंग रामभाऊ डोंगरे शोभा पांडुरंग डोंगरे हे दोघे जबर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी घराचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले. आतील महिलांच्या अंगावरील दागिने तसेच रोख चाळीस हजार मिळून एक लाखाचा ऐवज लंपास केला.

आरोपींनी तेथील जवळच्या भास्कर मुरलीधर पवार यांच्या घरावर चाल केली. या गुन्ह्यात पवार यांना जबरी मारहाण झाली. मात्र, त्यांच्या घरातून ऐवज गेला नाही. पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासकामी सूचना दिल्या. फौजदार बी. आय. हिवरकर हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. फिर्यादींनी आरोपीचे वर्णन पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार काही संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. या गुन्ह्यातील आरोपीना तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिस उपअधीक्षकांकडे केली आहे.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget