History of Maharashtra

कर्जतमध्ये काँग्रेसला गटबाजीचा फटका

कर्जत । DNA Live24 - कर्जत तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटात भाजपला जागा, तर राष्ट्रवादीला जागा मिळाल्या आहेत. आठ पंचायत समिती गणापैकी भाजप राष्ट्रवादी शिवसेना अपक्षाला जागा मिळाली. काँग्रेसला मात्र डॉ. सुजय विखे यांनी लक्ष दिले होते. पण केवळ अंंतर्गत गटबाजीमुळे कर्जत तालुक्यात काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मागील वेळी झालेल्या निवडणुकांमध्ये कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जिल्हा परिषद पंचायत समिती होती. त्यानंतर एका अपक्षाला भाजपने पक्षात घेऊन कर्जत पंचायत समिती ताब्यात घेतली होती. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तडजोडीचे अर्थपूर्ण राजकारण केले होते. २०१२ च्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हा परिषदेच्या तीन जागा होत्या, तर पंचायत समितीच्या पाच जागा होत्या. काँग्रेसकडे जिल्हा परिषदेच्या दोन जागा होत्या. कर्जतचा सध्याचा निकाल पाहता काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget