History of Maharashtra

पुण्यात मुक्ता टिळक भाजपच्या पहिल्या महिला महापौर !

पुणे l DNA Live24 - पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक बहुमताने विजयी झाल्‍या. पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर विराजमान झाला आहे.

महापौरपदासाठी झालेल्‍या निवडणुकीत मुक्ता टिळक यांना ९८ मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या उमेदवार नंदा लोणकर यांना ४६ मते मिळाली. मुक्ता टिळक यांनी लोणकर यांचा ५२ मतांनी पराभव केला.  मतदानाप्रसंगी शिवसेनेने तटस्थेची भूमिका घेतली.

१६२ पैकी भाजपचे ९८ नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी ४०, काँग्रेस ११, शिवसेना १०, मनसे २ दोन जागा मिळवण्यात यश आले आहे. तर पुणे उपमहापौरपदी भाजपचेच नवनाथ कांबळे यांची बहुमताने निवड झाली. कांबळे यांना ९८ मते तर लता राजगुरु यांना ५२ मते पडली. कांबळे यांनी राजगुरु यांचा ४६ मतांनी पराभव केला. तसेच त्या पुण्यातील केसरी वाड्यात राहतात.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget