History of Maharashtra

मुख्यमंत्री बदलावर संघ नेत्याची प्रतिक्रिया

मुंबई l DNA Live24 - केंद्रात संरक्षण मंत्रिपद रिक्त झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती देण्याच्या बातमीनंतर राज्यभर अफवांना पेव फुटले होते. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर थेट DNALive24.com कडे याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. DNALive24.com ने याबाबत सर्वप्रथम बातमी दिली होती.

देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात चांगले काम आहे. त्यांना केंद्रात पाठविल्यास राज्य सरकार अस्थिर होण्याची शक्यता असून, केंद्रीय नेतृत्वाचाही फडणवीस यांना केंद्रात बोलाविण्याचा सध्यातरी कुठलाही विचार नसल्याचे संघाच्या नेत्याने सांगितले. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार आहेत.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी राजीनामा दिला. त्यामुळे त्यांची केंद्र सरकारमधील जागा रिकामी झाली आहे. त्यांच्या जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी संभाजी पाटील निलंगेकर व चंद्रकांत दादा पाटील यांच्या चुरस निर्माण झाल्याचे बोलले जात होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात जोरदार घोडदौड केली. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह महानगरपालिकांमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. फडणवीस यांच्या झंजावती दौर्यांमुळे भाजपला हे यश मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यासाठी केंद्रीय नेतृत्व विचार करत असल्याचीही चर्चा होती. 
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget