History of Maharashtra

दत्तक विधानमुळे ऐतिहासिक नगरशी नाते जुळले


अहमदनगर । DNA Live24 - इतिहास शिकताना शाळेत अहमदनगरचे नाव ऐकले होते. परंतु वर्ष २०११ मध्ये अनया, या बालिकेला स्नेहांकुर केंद्रातून दत्तक घेतल्यानंतर नगरशी एक नाते तयार झाले, असे प्रतिपादन मिली आणि प्रशांत रविप्रसाद या दाम्पत्याने केले. मिली आणि प्रशांतला आज आरिन, हे दुसरे बालक स्नेहांकुर केंद्रातून सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा आडम यांच्या हस्ते दत्तक देण्यात आले.

अहमदनगरची वैशिष्ठ्ये, संस्कृती, परंपरा जाणून घेण्यासाठी सर्व नगरप्रेमींचा 'हेरीटेज वॉक' इतिहासप्रेमी आणि जेष्ठ पत्रकार भूषण देशमुख सातत्याने आयोजित करतात. आज सावेडी भागातील क्रीडामहर्षी मेजर दिनुभाऊ कुलकर्णी क्रीडांगणाला या उपक्रमाच्या अंतर्गत भेटीचे आयोजन करण्यात आले हाते. चित्रकार योगेश हराळे यांनी नगरमधील ऐतिहासिक वास्तू, सामाजिक - शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था, कर्तबगार आणि समर्पित व्यक्ती, अशांची चित्र या क्रीडांगणाच्या भिंतीवर चितारली आहेत.

नगरच्या समग्र इतिहासाची माहिती देशमुख यांनी यावेळी उपस्थितांना दिली. त्यानंतर तेथेच हा अनोखा दत्तक विधान सोहळा संपन्न झाला. आपला दुसरा मुलगाही स्नेहांकुरमधूनच दत्तक मिळाल्याने आपले कुटुंब परिपूर्ण झाल्याने नमूद करून मिली म्हणाल्या की, अहमदनगरने आमची स्वप्नपूर्ती केली. त्यामुळे बंगलोरमध्ये नोकरीसाठी स्थिरवलो असलो तरी, अहमदनगर हेच आमचे सर्वात प्रिय शहर बनले आहे.

'हेरीटेज वॉकमध्ये सहभागी झाल्यावर जाणवले की, अहमदनगर हे भारतातील एक महत्वपूर्ण आणि अद्वितीय असे ऐतिहासिक शहर आहे. भारताचे महानगरीकरण होत असताना सर्व शहरे एक सारखीच होत असताना आपला स्वत: चा स्वतंत्र चेहरा 'हेरीटेज वॉक' सारख्या उपक्रमातून नगरने जपला, याचे कौतुक वाटते असे या दाम्पत्याने नमूद केले. अतुल महाडिक आणि युनुस देसाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget