728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कोपर्डी खटला - अॅड. उज्वल निकमांना तपासायचांय नवा साक्षीदार

अहमदनगर । DNA Live24 - कोपर्डी खटल्यात अॅड. उज्वल निकम यांनी एका नव्या साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. या साक्षीदाराचे नाव दोषारोपपत्रासोबत जोडलेल्या यादीत नाही. पण, खटल्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्यामुळे त्यांची साक्ष नोंदवण्याची परवानगी निकम यांनी मागितली आहे. तसा लेखी अर्ज त्यांनी न्यायालयात केला आहे. त्यावर आता १७ मार्चला सुनावणी होणार आहे.

जिल्हा सत्र न्यायालयात कोपर्डी खटल्याचे कामकाज सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम काम पहात आहेत. गुरूवारी आरोपी संतोष भवाळचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे गैरहजर असल्यामुळे खटल्याचे कामकाज गुरूवारपुरते स्थगित झाले होते. शुक्रवारीही तसेच झाले. आरोपी भवाळ याचे वकील खोपडे न्यायालयात अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा न्यायालयाचे कामकाज स्थगित करण्यात आले. आता या खटल्याची पुढील सुनावणी १७, १८, २० व २१ मार्चला होणार आहे.

अॅड. निकम यांनी पुण्यातील एका साक्षीदाराची साक्ष नोंदवण्याची परवानगी मागितली. या साक्षीदाराला पुण्यात असताना पीडित मुलीच्या नातेवाईकाडून कोपर्डी घटनेची माहिती मिळाली होती, पोलिस तपासात मात्र त्याचा जबाब नोंदवलेला नाही, त्यामुळे न्यायालयात त्याची साक्ष नोंदवण्याची परवानगी अॅड. निकम यांनी मागितली आहे. या अर्जावर १७ मार्चला निर्णय अपेक्षित आहे.

दरम्यान या प्रकरणातील आरोपी नितीन भैलुमेला परीक्षा द्यायची असल्याने पुस्तके उपलब्ध करुन द्यावीत, असा अर्ज त्याच्या वकिलांनी यापूर्वी केलेला होता. त्यावर सरकारी पक्षाने म्हणणे दिलेलेे होते. त्यामुळे आरोपीला विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कोठडीत आवश्यक ती पुस्तके उपलब्ध करुन देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कोपर्डी खटला - अॅड. उज्वल निकमांना तपासायचांय नवा साक्षीदार Rating: 5 Reviewed By: DNA Live24