History of Maharashtra

राधाकृष्ण विखे हे भाजपचे पपेट : अशोक विखे - पाटील यांचा आरोप

पुणे l DNA Live24 - राधाकृष्ण विखे पाटील हे भारतीय जनता पक्षाचे पपेट आहेत. शासनाविरोधात आरोप केल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तरे द्यावीत. हे विखे-पाटील मुख्यमंत्र्यांना सांगतात, असा गंभीर आरोपही अशोक विखे पाटील यांनी केला आहे. अशोक विखे यांनी केलेल्या या आरोपामुळे विखे कुटुंबातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.

जेष्ठ नेते स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनानंतर विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे व त्यांचे बंधू अशोक विखे यांच्यात प्रवरा ट्रस्टच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक शिक्षण संस्था, धर्मादाय संस्था, हॉस्पिटल्स यांच्यावरून मतभेद असल्याची चर्चा होती.

आज पुण्यात अशोक विखे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर अनेक आरोप केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेकायदेशीरपणे प्रवरा ग्रामीण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्षपद स्वत:कडे घेतले असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे बंधू अशोक विखे पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
'बाळासाहेब विखे पाटील यांनी सुमारे अडीच वर्षापूर्वी माझ्याकडे प्रवरा ग्रामीण एज्युकेश सोसायटीची जबाबादारी दिली होती. त्यानुसार धर्मदाय आयुक्त कार्यालयात याबाबतचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावास अध्याप मंजूरी देण्यात आली नाही. परंतु,राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रस्ताव सादर करून त्यास एका दिवसात मंजूरी घेतली. सत्तेचा गैरवापर करून त्यांनी ही मंजूरी घेतली आहे. त्यामुळे याबाबत मी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे' असे अशोक यांनी सांगितले. बाळासाहेब विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्था स्वता:च्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखे पाटील व राजेंद्र विखे पाटील करत असल्याचा आरोपही अशोक विखे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

झाकीर नाईकच्या संस्थेने दिली २ कोटींची देणगी - झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनकडून प्रवरा मेडिकल महाविद्यालयाने दोन कोटी रुपयांचा निधी घेतला असल्याचा आरोपही अशोक यांनी यावेळी केला. मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे. ईडीच्या एका अधिका-याकडून ही माहिती समजली असल्याचेही त्यांनी सांगितले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget