History of Maharashtra

श्रीमंत बालाजी गणेश मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात

अहमदनगर । DNA Live24 - पंचरंग युवक मंडळ (ट्रस्ट) पंचरंगगल्ली तोफखाना येथे श्रीमंत श्री बालाजी गणेश मंदिराच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजिन करण्यात आले. तसेच यावेळी आयोजित महाप्रसादाचा 3 ते 5 हजार भाविकांनी लाभ घेतला. हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.

शुक्रवारी संध्याकाळी हनुमान चालिसा, श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ, पुरातन श्रीराम मंदिर, नवीपेठ, शनिवारी अथर्वशीर्ष पठण सादरकर्ते महिला मंडळ, तोफखाना, रविवारी सकाळी गणेश पुजन, अभिषेक व पूजा, पुण्यवचन, मातृकापुजन, नक्षत्र पूजन, नवग्रह पूजन होम हवन व दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आले. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप झाले.

यावेळी संभाजी कदम, संजय चोपडा, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बोगा, अध्यक्ष अमोल दंडी, उपाध्यक्ष अंकुश आडेप, महेश रोल्ला, अक्षय आडेप, रोहित येनगुपटला आदि उपस्थित होते. यावेळी अनिल राठोड म्हणाले, हे मंगलमय वातावरण पाहून मन आनंदी झाले. पंचरंग युवक मंडळे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवत असतात.

रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, सामुदायक तुलसी विवाह, गणेश जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, सारखे उपक्रम साजरे करतात. सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांना एकत्र करण्याचे काम ते करत आहेत. याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, सामाजिक कार्य व परंपरा जपणं सर्वांना सोबत घेऊन उपक्रम राबविणे हे या मंडळाचा मानस आहे.

सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी मंडळाचे सदस्य नेहमी धडपड करत असतात. वर्धापन दिनाचे हे 5 वे वर्ष आहे. वर्धापन दिनानिमित्त येथे भाविकांची महाप्रसादासाठी मोठी गर्दी पाहून मन आनंदी झाले. वर्धापनदिनाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget