History of Maharashtra

नगर जिल्हा परिषदेत महिलाराज !

अध्यक्षपदी शालिनीताई विखे (काँग्रेस), राजश्री घुले (राष्ट्रवादी) उपाध्यक्ष

शालिनीताई विखे
राजश्रीताई घुले
अहमदनगर । DNA Live24 - नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनीताई राधाकृष्ण विखे या ५२ मते मिळवून विजयी झाल्या. तर राष्ट्रवादीच्या राजश्री चंद्रशेखर घुले ५१ मते मिळवून उपाध्यक्ष झाल्या. त्यामुळे नगर जिल्हा परिषदेत महिला राज सत्तेवर आले आहे. अध्यक्षा शालिनी विखे यांनी भाजपच्या सदाशिव पाचपुते यांचा पराभव करुन तिसऱ्यांदा अध्यक्ष झाल्या आहेत. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीकारी शेतकरी पक्षाने उपाध्यक्ष पदासाठी नशिब आजमावले. पण, त्यात त्यांना यश आले नाही.

मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नूतन पदाधिकाऱ्यांची निवडणुक पार पडली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शालिनीताई विखे यांना ५२, तर भाजपचे सदाशिव पाचपुते यांना अवघी १९ मतं पडली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, श्रीरामपूरची महाआघाडी, डावी आघाडी यांनी विखेंना साथ दिली. तर क्रांतीकारी शेतकरी पक्षाने मात्र भाजपला साथ दिली. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. अन् शालिनीताई विखेंनी विजयावर शिक्कामोर्तब केले.

शालिनीताई विखे यांना तिसऱ्यांदा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वीही दोन वेळा त्यांनी अध्यक्षपद भूषविलेले आहे. या निवडीमुळे विखे यांच्या घरात आता दोन व्यक्ती नामदार होण्याचा बहुमान मिळाला आहे. शालिनीताई विखे यांच्या नावाची सुरुवातीपासून जोरदार चर्चा होती. मात्र विखे व थोरात गटातील सुप्त गटबाजीमुळे त्यांच्या नावाला विरोधही झाला होता. त्यातूनच श्रीगोंद्याच्या अनुराधा नागवडे यांचे नाव अध्यक्षपदासाठी समोर आले होते.

निवडीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. निवडणूक कार्यकारी अधिकारी तथा पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी काम पाहिले. मावळत्या पदाधिकाऱ्यांनी निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले आदी नेतेमंडळीही हजर होती.

मतांची गोळाबेरीज - 
अध्यक्ष - शालिनीताई विखे (काँग्रेस) -  ५२,
               सदाशिव पाचपुते (भाजप) - १९
उपाध्यक्ष - राजश्री घुले (राष्ट्रवादी) - ५१,
                 दादासाहेब शेळके (क्रा. शे. प.) - २०


Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget