History of Maharashtra

बॅगलिफ्टिंग करणारे दोन चोरटे गजाआड

अहमदनगर । DNA Live24 - तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत तारकपूर परिसरात एका मोटारसायकलस्वाराची पैशांची भरलेली बॅग चोरणारे दोन आरोपी पोलिसांनी पकडले आहेत. हा प्रकार ११ मार्चला रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडला होता. एका व्यक्तीची रोख रक्कम असलेली बॅग दोन चोरट्यांनी मोटारसायकलवर येत बळजबरीने चोरून नेली होती. त्यात सुमारे चार लाख रुपयांची रोकड होती.

याप्रकरणी ताेफखाना पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. गुन्हा नोंदवल्यापासून पोलिस चोरट्यांचा शोध घेत होते. सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण वाखारे, पोलिस उपनिरीक्षक विकास काळे, पोलिस नाईक अमित महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी संदीप पवार, रोहोकले यांनी नगर औरंगाबाद रोडवर महापालिकेसमोर सापळा लावुन आरोपींना पकडले.

जालिंदर पांडुरंग गायकवाड (वय 30, रा. भोसले आखाडा) व नंदू फकिरा शिंदे (वय 30, देसवंडी ता. राहुरी) अशी पोलिसांनी पकडेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून एक विनाक्रमांकाची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. त्यांनी या गुन्ह्यासह इतरही आणखी काही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget