History of Maharashtra

प्रवचनकाराचा मुलगा झाला तहसीलदार


नेवासा । DNA Live24 - ह. भ. प. प्रवचनकार भागचंद पाठक यांचा मुलगा नजिकचिंचोली गावाचा सुपुत्र अमोल भाकचंद पाठक यांनी राज्यसेवा आयोगाच्या माध्यमातून तहसीलदार पदाची परीक्षा उतीर्ण केली आहे. तहसीलदार झाल्याबद्दल त्यांचा नजिकचिंचोली ग्रामस्थांच्या वतीने सत्काराद्वारे गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात झालेल्या नागरी सत्कार समारंभ अध्यक्षस्थानी खड़ेश्वरी देवस्थानचे महंत गणेशानंद महाराज हे होते. यावेळी तहसीलदार झालेल्या अमोल पाठक यांच्यासह त्यांचे वडील ह.भ.प. भाकचंद महाराज पाठक व आई आशाताई पाठक, चुलते जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब पाठक यांचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच अँड. बन्सीभाऊ सातपुते यांनी प्रास्ताविक केले.

सत्काराला उत्तर देतांना तहसीलदार अमोल पाठक म्हणाले, शिक्षण घेत असतांना माझ्या कष्टाला बळ देण्याचे काम माझ्या आई वडीलांनी केले. शालेय शिक्षण भेंडा येथे झाले हे सांगुन त्यांनी या कालावधीत मला अनेकांचे सहकार्य मिळाल्याचे सांगितले.

यावेळी सरपंच सौ अनिता पाठक, सोसायटीचे अध्यक्ष भागचंद चावरे, गणेश महाराज चौधरी, ह.भ.प. महादेव धाडगे, ह.भ.प. कारभारी चौघुले, सोपान नवले, बाबुराव चावरे, आन्नासाहेब पाठक, शिवाजी पाठक, बाबासाहेब सोनपुरे, मुख्याध्यापक राधाकृष्ण वाघमारे, ह.भ.प. कारभारी चौघुले, शिवाजी चावरे, सुखदेव पाठक, भाऊसाहेब गोंधळी, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष कान्हू दाणे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेचे अध्यापक बुथवेल हिवाळे यांनी केले. सरपंच शिवाजी पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget