History of Maharashtra

मैफलच्या माध्यमातून जीवन निरोगी जगण्याचा संदेश

अहमदनगर । DNA Live24 - डॉक्टर व कॅन्सरग्रस्त रुग्णांनी हीलिंग हार्मनी संगीत मैफलमध्ये हिंदी, मराठी व भक्तीगीत सादर करुन, उपस्थितांना दिलखुलास जगण्याची प्रेरणा दिली. तर निरोगी राहण्याचा बहुमोल संदेश दिला. श्री मार्कंडेय विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त श्रमिक नगर येथील मार्कंडेय विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या संगीत मैफलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर तज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी व सहकलाकार प्रतिभा कर्णिक यांनी एकापेक्षा एक सरस गीत सादर करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे शरद क्यादर, रमेश सब्बन, विलास पेद्राम, चंद्रकांत मिठापेल्ली, बाळकृष्ण सिद्दम, सोमनाथ केंची, नागभूषण दुर्गम, शंकरराव सामलेटी, नागनाथ बुध्दवाड, शंकरराव कुंटुरकर, क्रीडाधिकारी प्रमोदिनी गड्डमवार, पंकज मुनोत, रंजना मुनोत, हरीभाऊ कोलते, अरविंद चन्ना, प्रभाकर क्यादर, रावसाहेब क्षेत्रे, सरोजनी रच्चा, पवन नाईक, विद्यार्थी, पालक व रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात बाळकृष्ण सिद्दम यांनी सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमांची माहिती देवून, शाळेच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापिका विद्या दगडे यांनी केले. मैफलमध्ये श्रोत्यांशी संवाद साधताना डॉ. शेखर कुलकर्णी म्हणाले की, कॅन्सर हा रोग तंबाखू, विडी, सिगारेट आदिंच्या सेवनाने होत असून, या रोगाने महायुध्दापेक्षा जास्त लोक दरवर्षी मरण पावत आहे. कॅन्सर न होण्यासाठी निसर्गाशी मैत्री करणे गरजेचे आहे.

वेद व उपनिषदात मनुष्याचे आयुर्मान शंभर वर्षे सांगितले आहे. मात्र मनुष्य जगण्या अगोदरच विचारांनी मरतो. जगात सर्वात जास्त मृत्यू कार्डियाक (ह्रद्यरोग), कॅन्सर, व कार अ‍ॅक्सीडेंट या तीन सी ने होतात. सध्या जगात ब्रेस्ट कॅन्सरची साथ आली आहे. पाश्‍चात्य देशात 8 पैकी प्रत्येक एक स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर होतो. तर भारतामध्ये याचेप्रमाण २२ स्त्रीयांमध्ये एका स्त्री एवढे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॅन्सर टाळण्यासाठी विविध सल्ले देवून, हा आजार ओळखण्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

सिनेकलाकार नसिरुद्दीन शाह व विक्रम गोखले यांनी हीलिंग हार्मनी संगीत कार्यक्रमाच्या केलेल्या कौतुकाची चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. उपनिषदातील श्‍लोकाने कार्यक्रमाची सुरवात झाली. कुहू कुहू बोले कोयलिया..., जब दिप जले आना, जब शाम ढले आना..., अजीब दास्ता है ये, कहॉ सुरु कहॉ खतम..., ये हसी वादिया ये खुला ऑसमा..., विठ्ठला तू वेडा कुंभार... आदि गाण्यांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. लागा चुनरी में दाग छुपावू कैसे... या गाण्याने मैफलची सांगता झाली.

उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक शशिकांत गोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget