History of Maharashtra

फिरोदिया परिवारातर्फे पांजरपोळमध्ये अत्याधुनिक शेड

अहमदनगर - DNA Live24 - खरी गरज व समाजहित पाहून सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याची परंपरा फिरोदियांच्या आजच्या पिढीने जोपासली आहे. पांजरपोळ संस्थेच्या कार्यात १२५ वर्षांहून अधिक काळ विविध प्रकारे कार्य करून आजही भाकड गायींची सांभाळण्याची समस्या ओळखली. त्यासाठी अत्याधुनिक शेड उभारुन आधुनिकतेबरोबर परंपरा व संस्कार जोपासणाऱ्या फिरोदिया परिवाराचे योगदान अतुलनीय आहे, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

माजी खासदार स्व. मोतीलाल कुंदनमल फिरोदिया स्मरणार्थ पांजरपोळ येथील ‘अत्याधुनिक शेड’चे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ललिता फिरोदिया, आशाताई फिरोदिया, छायाताई फिरोदिया, नरेंद्र व रिंकू फिरोदिया, विक्रम व नमिता फिरोदिया, गौरव व कल्याणी फिरोदिया, राजेंद्र चोपडा, अरविंद गुंदेचा, आनंद बोगावत, रमेश पितळे, रमेश मंडलेचा, नरेंद्र गुजराथी, महेंद्र मुनोत,पांजरपोळ सचिव किशोर मुनोत, उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र फिरोदिया म्हणाले कि, पांजरपोळ गोरक्षण संस्थेने या अभिनव उपक्रमास जागा व परवानगी देऊन सहकार्य केले. त्यामुळे आज १६ हजार स्क्वे.फुटाची भव्य अशी गोशाळासाठी आधुनिक शेड उभी राहिली. या ठिकाणी पूर्णवेळ डॉक्टर सेवा उपलब्ध आहे. समाज व नगर साठी जे काही चांगले करता येईल ते परिवार व फिरोदिया ट्रस्ट तर्फे सतत केले जाईल व पूर्वजांची परंपरा कायम राखली जाईल असे सांगितले.

राजेंद्र चोपडा यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. सन १९१५ पासून फिरोदिया परिवाराचे पांजरपोळ संस्थेशी ऋणानुबंध नाते आहे. गोसेवेचे काम अत्यंत महत्वाचे व गरजेचे आहे. हे ओळखून दुष्काळात भाकड जनावरांचे होणारे हाल कमी करण्यासाठी या अत्याधुनिक शेडचा प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यास फिरोदिया परिवाराने आर्थिक मदत केल्याने उत्तम शेड तयार झाले. यामध्ये अनेकांची मदत मोलाची ठरली. चांगल्या कार्यात सर्वांचे सहकार्य सतत लाभेल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रदीप भिंगारवाला यांनी पाण्याची टाकी व प्रसन्न मुथा यांनी ई रिक्षा भेट दिल्याबद्दल व अरुणोदय गोशालाद्वारे सेवा देणारे मनीष कुलडहाळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब गांधी, श्रीगोपाल धूत, अॅड. शरद पल्लोड, मोहन मानधना, अशोक बोरा, शरद मुनोत, प्रमोद मेहेर, अमृत मुथा, नरेंद्र गुजराथी, राजेंद्र गुंदेचा, आशिष पोखरणा, मनोज नहार व मान्यवर उपस्थित होते. सर्वांचे आभार आनंद बोगावत यांनी मानले.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget