History of Maharashtra

अपहरण करून मुलं नगरमध्ये भिकेला !

नगर । DNA Live24 - परराज्यातून लहान मुलांचे अपहरण करून नगरमध्ये त्यांना भीक मागायला लावणारे रॅकेट असून, शहरातील चौकाचौकात फिरणाऱ्या भिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने करण्यात आली.

याबाबत अपर पोलीस अधीक्षक घनशाम पाटील यांना मनविसेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, गौरव महामुनी, अविनाश शेरकर, सुमित फुलारी, ऋषिकेश हजारे, अमित सुरपुरिया, सुरज डहाळे, अनिकेत शियाळ, निखिल देशपांडे, स्वप्नील वाघ, तुषार इंगळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे कि, शहरातील प्रमुख चौकांमध्ये सध्या संशयास्पदरित्या फिरणाऱ्या वर्गाची संख्या अचानकपणे वाढली आहे. सक्कर चौक, मार्केट यार्ड चौक, प्रेमदन चौक, पत्रकार चौक, डीएसपी चौक या भागात काही महिन्यांपासून भिकाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या भिकार्यांसोबत लहान मुले असतात. भिकाऱ्यांच्या चेहऱ्याशी या लहान मुलांचे अजिबात साधर्म नसते.

यामागे मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. परराज्यातून मुलांना अपहरण करून त्यांना दुसऱ्या राज्यात भिकेला लावण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी मुंबई, औरंगाबाद याठिकाणी असाच प्रकार उघडकीस आला होता. नगरमध्येही असाच प्रकार असण्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे. यापूर्वीही भिकारी असायचे मात्र अचानकपणे त्यांची वाढलेली संख्या विचार करण्याजोगी आहे.

हा प्रकार अत्यंत गंभीर असू शकतो. याबाबत प्रशासनाने चौकशी करण्याची गरज आहे. यामधून काही मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. यातून मोठी गुन्हेगारी, चोरी, अपहरणाच्या गुन्ह्यांची उकलन होऊ शकते. असेही निवेदनात म्हटले आहे.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget