History of Maharashtra

‘स्त्री खरंच बंधमुक्त झाली का' : मंगळवारी परिसंवाद

अहमदनगर । DNA Live24 - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘स्त्री खरंच बंधमुक्त झाली आहे काय? या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी १४ मार्चला सायंकाळी ५ वाजता गुलमोहर रस्त्यावरील गुलमोहर पोलिस चौकी समोर प्रयत्न नर्सिंग कॉलेजच्या सभागृहात हा परिसंवाद होणार आहे, अशी माहिती मसापच्या उपाध्यक्षा आणि कार्यक्रम प्रमुख डॉ. शितल म्हस्के यांनी दिली.

साहित्य परिषदेच्या अधिदेशक प्रा. मेधा काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाचे उद्घाटन दारूबंदी चळवळीच्या प्रणेत्या अॅड. रंजना गवांदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रख्यात उद्योजिका व कवियत्री उषा देशमुख, न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा अॅड. निर्मला चौधरी आणि गौरी गडाख या परिसंवादात सहभागी होणार आहेत. मसापचे अध्यक्ष अनिरूध्द देवचक्के, कार्याध्यक्ष किशोर मरकड आणि केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत पालवे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या परिसंवादात शहरातील विविध महिला मंडळाच्या सदस्या, महाविद्यालयीन विद्यार्थिनी सहभागी होतील. या परिसंवादासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यवाह प्रा. चं. वि. जोशी, प्रा. गणेश भगत, कोषाध्यक्ष प्रा. एन. बी. मिसाळ, उपाध्यक्ष डॉ. शरद सांब, कार्यकारिणी सदस्य डॉ. खासेराव शितोळे, शिल्पा रसाळ, श्याम शिंदे, ल. धो. खराडे, वसंत लोढा, निसार शेख, प्रा. दशरथ खोसे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget