History of Maharashtra

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल ; निष्क्रिय मंत्र्यांची गच्छंती

नवी दिल्ली l DNA Live24 - केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. उत्तरेतल्या भाजपच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिल्लीत आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे निष्क्रिय मंत्र्यांची गच्छंती होणार आहे.

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसुंधरा राजे यांच्या जागी ओम माथूर यांना राजस्थानात मुख्यमंत्री म्हणून पाठवलं जाण्याची चिन्हं आहेत.

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एखाद्या खासदाराला राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.  वसुंधराराजे या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या.  येत्या 12 एप्रिलला संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशऩ संपणार आहे. त्यानंतर लगेचच मोदी मंत्रिमंडळात फेरबदल करतील अशी शक्यता आहे.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget