History of Maharashtra

मराठी भाषा दैनंदिन व्‍यवहाराची झाली पाहिजे - राजेंद्र सरग


अहमदनगर । DNA Live24 - मराठी भाषा ही आपल्‍या दैनंदिन व्‍यवहाराची, रोजगाराची, जीवनाची भाषा झाली पाहिजे. आधुनिक काळात ही भाषा टिकण्‍यासाठी तसेच विस्‍तारण्‍यासाठी या भाषेचा सर्वांगीण विकास होणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्‍त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

जिल्‍हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्‍हा माहिती कार्यालयाच्‍या वतीने मराठी ग्रंथांचे तसेच लोकराज्‍य मासिकाचे प्रदर्शन आयोजित करण्‍यात आले होते. कार्यक्रमास जिल्‍हा ग्रंथालय अधिकारी सुभाष मुंढे, संपत वाघचौरे, बापू शिवदे, संदीप नन्‍नवरे, लक्ष्‍मण सोनाळे, प्रियंका भोगे आदींची उपस्थिती होती. जिल्‍हा माहिती अधिकारी सरग म्‍हणाले, मराठी भाषेला आणि साहित्‍याला मोठा वारसा आहे. या वारसा जपण्‍याचे त्‍यात वाढ करण्‍याचे आपणा सर्वांसमोर आव्‍हान आहे. मराठी भाषेचा केवळ पोकळ अभिमान न बाळगता, कृतीतून मराठी भाषेवरील प्रेम व्‍यक्‍त झालेले दिसले पाहिजे.

जिल्‍हा ग्रंथालय अधिकारी सुभाष मुंढे यांनीही मराठीचा गौरव करतांना वाचनचळवळीचे महत्‍त्‍व अधोरेखित केले. मराठी वाचकांना उत्‍तमोत्‍तम ग्रंथ उपलब्‍ध करुन देण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत असून इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषेतील अनुवादही वाचकांना उपलब्‍ध व्‍हावेत, यासाठी प्रयत्‍न केले जातील. मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रचार, प्रसार झाला पाहिजे. आपली मराठी भाषा सकस होण्‍यासाठी वाचनही सकस झाले पाहिजे. नव्‍या पिढीनेही वाचनावर भर दिला पाहिजे, असे ते म्‍हणाले. यावेळी प्रियंका भोगे, संपत वाघचौरे यांचीही समयोचित भाषणे झाली.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget