History of Maharashtra

'मसाप'ने भरवली कुसुमाग्रजांच्या कवितांची मैफिल


अहमदनगर । DNA Live24 - नांदी, कणा, मॅकबेथ, सूर्यफूल, गर्जा जयजयकार, अखेर कमाई, अदि-नकूल, मराठीपण.. कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांच्या कवितांचे अभिवाचन आणि नटसम्राट या अजरामर नाट्यकृतीतील स्वगतांचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अहमदनगर शाखा आणि जिल्हा वाचनालयाच्या वतीने संयुक्तपणे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या लोकमान्य सभागृहात कवितांची ही मैफिल रंगली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी तहसीलदार गणेश मरकड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते. व्यासपिठावर मसापचे अध्यक्ष अनिरूध्द देवचक्के, कार्याध्यक्ष किशोर मरकड, कार्यक्रम प्रमुख शिल्पा रसाळ, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, अपाध्यक्ष अजित रेखी, सहकार्यवाह उदय काळे उपस्थित होते. प्रा. एम. डी कुलकर्णी यांनी नटसम्राट नाटकातील स्वगत सादर करीत नटसम्राट मधील भाषेचे अभिजात सौदर्य वाचिक अभिनयातून उलगडून दाखविले.

यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना उभे राहून मानवंदना दिली. मसापचे कोषाध्यक्ष एन. बी. मिसाळ, मेधा काळे, प्राचार्य खासेराव शितोळे, शिरीष मोडक, अजित रेखी, उदय काळे, नितीन जावळे, किरण डहाळे, ऋृता ठाकूर, प्रतिक कुलकर्णी, मसापचे केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत पालवे, अनुराधा मिसाळ यांनी कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे अभिवाचन केले. गणेश मरकड यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा आढावा घेत त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये सांगितली.

सरग यांनी मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परिषदेच्यावतीने गणेश मरकड यांच्या पुस्तकाला ५ राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच व्यंगचित्र पुरस्काराचे मानकरी राजेंद्र सरग यांचा, पत्रकार उध्दव काळापहाड यांनी शिवाजी कोण होता, या ऑडिओ बुकची निर्मिती केल्याबद्दल तसेच पत्रकार दौलत झावरे यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या राज्यस्तरिय निबंध स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

देवचक्के यांनी मसपाच्या ‘वाचकांनो लिहिते व्हा’ या चळवळींतर्गत मसपा संवाद केंद्र सुरु करण्यासाठी आवाहन केले. प्रा. मोडक यांनी मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिल्पा रसाळ यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची संकल्पना विषद केली. वाचनालयाचे निमंत्रित सदस्य गणेश आष्टेकर यांनी आभार मानले. यावेळी परिषदेचे कार्यवाह गणेश भगत, वाचनालयाचे संचालक दिलीप पांढरे, किरण अग्रवाल, भालचंद्र आपटे, नंदकिशोर आढाव व साहित्यरसिक उपस्थित होते.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget