History of Maharashtra

आमदार जगतापांनी घेतला चमकोगिरी करणारांचा समाचार


अहमदनगर । DNA Live24 - आमदार संग्राम जगताप महापालिकेत महापौर असताना त्यांनी विविध विकासकामे केली. या कामांचा पाठपुरावाही केला. मात्र, त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांचे श्रेय सध्या दुसरेच नेते लाटत असल्याने आमदार जगताप चांगलेच भडकले. एका विकासकामाचे उद्धाटन करताना त्यांनी अशा चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.

अामदार जगताप म्हणाले, बाहेरुन शहरात येणारा नागरिक पहिल्यांदा रेल्वे स्टेशनल जातो, तेव्हा जुन्या पुलावजवळ नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्याला दिसते. खरे तर आमच्या कार्यकाळात मंजुर झालेल्या या पुलाच्या कामासाठी वाढिव निधी तरतुदीचे प्रयत्न चालू आहेत. पण, काही राजकीय मंडळी येथे फोटो काढून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला.

लोखंडी ऐतिहासिक पुलाचे जतन करुन, त्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे. तसेच सिना पात्रातील अतिक्रमण काढून सिना सुशोभीकरण प्रकल्प लवकरच सुरु करु, असेही आमदार संग्राम जगताप म्हणाले. प्रभाग क्रमांक 28 रेल्वेस्टेशन, शिवनेरी चौक येथील आदर्श कॉलनीमध्ये ओपन स्पेसवर उभारण्यात येणाऱ्या उद्यानाच्या भूमीपुजन प्रसंगी आमदार जगताप बोलत होते.

यावेळी नगरसेवक विजय गव्हाळे, संभाजी पवार, अनिल शर्मा, अशोक गांधी, जे. डी. खानदेशे, राजेंद्र आंधळे, अमित गांधी, गणेश औसरकर, हेमंत थोरात, शेखर डोंगरे, अशोक अकोलकर, हेमंत गुगळे, वसंत फिरोदिया, अतुल शिंगी, सौरभ डौलारे, अभय श्रीमल, संदेश चुंबळकर, प्रविण कटारिया, सचिन जोशी, आर.टी. शर्मा, अमृत मुथियान, ढोले, मुरुमकर आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अामदार जगताप म्हणाले की, रेल्वे स्टेशन येथील महिला व ज्येष्ठ नागरिकांना सकाळी निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासाठी व मुलांना खेळण्यासाठी उद्यान उपयुक्त ठरणार आहे. उद्यान व इतर विकासात्मक कामासाठी नगरसेवक गव्हाळे व पवार यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला असल्याचे सांगून, लवकरच शिवनेरी चौक ते स्वीट कॉर्नरच्या रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरु करु, असे त्यांनी आश्‍वासन दिले.

प्रास्ताविकात नगरसेवक विजय गव्हाळे यांनी प्रभागात मार्गी लावलेल्या विकासात्मक कामाची माहिती दिली. कामाचे भुमीपूजन आ.जगताप यांच्या हस्ते झाले. संभाजी पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. उद्यानाचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल आमदार जगताप, नगरसेवक गव्हाळे व पवार यांचा नागरिकांनी सत्कार केला.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget