History of Maharashtra

पुरातन रिती, आधुनिक काळाची सांगड पुरोहित वर्गाने घालावी - मोहनराव दाते


अहमदनगर । DNA Live24 - भारताच्या पुरातन संस्कृतीप्रमाणे अनेक चाली-भाती परंपरागत पद्धतीने पाळण्याची पद्धत आहे. मात्र आजच्या आधुनिक काळामध्ये पुरातन चालीभाती तंतोतंत पाळणे शक्य नाही. यासाठी पुरोहित वर्गाने पुरातन रिती व आधुनिक काळ याची योग्य सांगड घालण्याचे काम करावे, अंधश्रद्धांचे निरसनही करावे, असे प्रतिपादन दाते पंचागकर्ते मोहनराव दाते यांनी केले. जिल्हा पुरोहित मंडळ ट्रस्टच्यावतीने दाते पंचागची शतकपुर्ती झाल्याबद्दल पंचांगकर्ते मोहन दाते यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या समारंभात ते बोलत होते. 

यावेळी भागवताचार्य महेश जोशी, वे. शा. सं. जयंत फडके आदि व्यासपीठावर उपस्थित होते. या गौरव समारंभास नगरमधील पुरोहित वर्गाबरोबरच विविध क्षेत्रातील ब्राह्मण समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गौरव सोहळ्यात नगरमधील ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच रांजण चित्रपटातील मुख्य नायिका  गौरी कुलकर्णी हिचाही सन्मान करण्यात आला.  पुरोहितांशी विवाह करणार्‍या अनेक तरुणींचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करुन अनोखा उपक्रम राबविला.

यावेळी मोहनराव दाते यांनी ‘धर्माचरण कसे असावे? कसे करावे ?’ या विषयावर सविस्तर व्याख्यान दिेले. यावेळी अनेक पारंपारिक घटनांचे दाखले व शास्त्रानुसार धर्माचरणाबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्हा पुरोहित संघाच्या कार्याचा गौरव करुन ब्राह्मण समाजाच्या संघटनाकरीता तसेच पुरोहित वर्गाचे समस्या व प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करण्याचे आवाहन यावेळी केले.

यावेळी भागवताचार्य महेश जोशी म्हणाले, वडिलधार्‍यांनी तसेच ऋषी-मुनींनी जी परंपरा दिली आहे, त्याचे पालन करणे म्हणजे धर्माचरण. स्नानाने शरीर शुद्ध होते तर बुद्धीतील दोष काढण्यासाठी भगवंताची पूजा हा एकमेव मार्ग आहे. भक्ती, ज्ञान व वैराग्य हे तीन घटक परमेश्‍वराकडे नेत असतात.

प्रास्तविकात मयुर जोशी यांनी सांगितले की, दाते पंचाग हे सर्व पुरोहितांचे प्रमुख मार्गदर्शक आहे. पंचांगाप्रमाणेच सर्व सण, उत्सव साजरे होऊन शुभ मुहूर्त काढले जात असतात, अशा मार्गदर्शक दाते पंचागाला 100 वर्ष पूर्ण झाल्याचा अभिमान जिल्हा पुरोहित संघाला आहे. म्हणूनच पंचांगकर्ते मोहनराव दाते यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्याचा निर्णय पुरोहित संघाने घेतला.  पुरोहित संघाची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे. जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा हा पहिलाच उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला मोठा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

यावेळी किशोर जोशी, सुहास मुळे, राजाराम धर्माधिकारी, अविनाश कुलकर्णी, नरेंद्र खिस्ती, निलेश धर्माधिकारी, सोमनाथ मुळे, प्रसाद दंडवते, विकास कुलकर्णी, श्रीहरि कुलकर्णी, प्रदीप जोशी, श्रीपाद धर्माधिकारी, प्रसाद पांडव, सुनिल जोशी, अक्षय चिंधाडे, जतीन शेटे, अनिकेत मुळे आदि जिल्हा पुरोहित मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

पुरोहितांनी अंधश्रद्धांचे निरसन करावे -  पुरातन काळात धर्माचरणाला अनन्य साधारण महत्व होते. आजच्या आधुनिक काळातही त्याला तेवढेच महत्व आहे. त्यामुळे पुरोहितांनाही महत्व आहे. कलियुगात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा वाढत आहेत. शास्त्रात अंधश्रद्धांना स्थान नसते, त्यामुळे पुरोहितांनी अंधश्रद्धांचे निरासन करुन यजमानांचे प्रबोधन करावे. पुरोहित हा यजमानांचे हित करणारा असतो. यासाठी पुरोहितांनी आधुनिक उपकरांच्याद्वारे मार्गदर्शन करावे, तसेच नवनवीन धार्मिक विधी शिकावे, 
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget