History of Maharashtra

नामदेव शिंपी समाज महिला ग्रुपतर्फे महिला दिन उत्साहात


अहमदनगर । DNA Live24 - स्त्री जन्माच्या स्वागतासाठी महिलांचा पुढाकार आवश्यक आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर त्याला प्रकाशमान करणारी स्त्री आहे. आपल्या कार्यकर्तुत्वाने प्रत्येक क्षेत्रात महिला आपली गुणवत्ता सिध्द करत आहे. म्हैसाळ (ता. मिरज) स्त्री भ्रुण हत्येचे प्रकरणाने मन सुन्न झाले असताना, मनुष्य म्हणून सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी व्यक्त केले.

माळीवाडा येथील नामदेव शिंपी समाज महिला ग्रुपच्या वतीने महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुष्पा डिडवानी, मंगल खत्ती, पूजा कावरिया, सुनिता अपुर्वा, मंगल अपुर्वा, सुनिता खत्ती, मनिषा खत्ती, सोनल डिडवानी, दिपाली डीडवानी, वसुंधरा विधाते, सोनल मेहेर, लता वर्मा, लता खत्ती, साधना डिडवानी आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिला दिना निमित्त ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रुपच्या ज्येष्ठ महिला मंगल मेहेर यांना आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच माणिक विधाते यांच्या वतीने महिलांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget