History of Maharashtra

यशवंतराव चव्हाण यांना राष्ट्रवादीतर्फे अभिवादन


अहमदनगर | DNA Live24 - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा बँक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, प्रा. अमोल खाडे, मयुर विधाते, उमेश आमटे, वैभव ढाकणे, मारुती पवार, आदिनाथ रक्ताटे, पंकज कर्डिले, प्रकाश भागानगरे, श्रीकांत कचरे, किरण मांडे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माणिक विधाते म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांच्या वैचारिक वारसा लोकनेते शरद पवार यांनी चालवला. त्यांच्या विचारातून प्रेरित होवून राजकारणापेक्षा समाजकारणाला राष्ट्रवादी पक्षाने अधिक महत्त्व दिले. यशवंतरावांच्या विचारांचा प्रभाव आजही राष्ट्रवादी पक्षामध्ये दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget