History of Maharashtra

चाईल्डलाईन केंद्र समन्वयकपदी प्राची सोनवणे

प्राची सोनवणे
अहमदनगर । DNA Live24 - महिला व बालकल्याण मंत्रालय भारत सरकार, चाईल्डलाईन इंडिया फौंडेशन व स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बालकांच्या हक्क व अधिकारासाठी तसेच न्याय व संरक्षण मिळून देण्यासाठी, २४ तास काम करणारी चाईल्डलाईन हि आपत्कालीन मोफत फोन १०९८ सेवा उपलब्ध आहे.  या चाईल्डलाईन सेवेच्या जिल्हा केंद्र समन्वयक पदासाठी प्राची सोनवणे यांची निवड करण्यात आली. चाईल्डलाईनचे सह-संचालक हनिफ शेख यांनी त्यांची निवड जाहीर केली.

संकटग्रस्त बालके, हरवलेली बालके, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली बालके, सापडलेली बालके, आजारी बालके, अनाथ निराधार बालकांसाठी चाईल्डलाईन अहोरात्र काम करते. जिल्ह्यात चाईल्डलाईन हि दरवर्षी ७६५ पेक्षा जास्त हक्क-वंचित बालकांना न्याय व संरक्षण मिळवून देते.चाईल्डलाईनच्या केंद्र समन्वयक पदासाठी बालकांच्या प्रति संवेदनशील, उच्चशिक्षित, कायद्यातील तरतुदी या विषयी परिपूर्ण ज्ञान, प्रेम व आदर असलेल्या व्यक्तीला विशिष्ट लेखी व मुलाखत पद्धतीद्वारे निवड केली जाते.

यापूर्वी या पदावर असलेले कृष्णा पाडवी यांची नुकतीच शासकीय क्षेत्रात निवड झाली. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी आता सोनवणे यांची निवड झाली. चाईल्डलाईन संस्थेत एक वर्षांपासून कार्यरत असलेल्या सोनवणे यांनी टिम मेंबर व समुपदेशक पदावर उल्लेखनीय काम केलेले आहे. स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी, अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर, वरिष्ठ सह-संचालक अनिल गावडे, शाहीद शेख, रवी भिंगारदिवे, माधुरी पवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget