History of Maharashtra

नुतनीकृत 'रेडिओ नगर'चे ‘गुढी पाडव्याला’लोकार्पण

अहमदनगर । DNA Live24 - शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक ,आर्थिक आणि नागरी विकासात गेल्याा ७ वर्षांपासून महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आणि नगरकरांचे लोकमाध्यम बनलेल्या 'रेडिओ नगर ९०.४ एफ. एम.' या रेडिओ वाहिनीचे नुतनीकरण पूर्ण झाले आहे. नव्या अत्याधुनिक प्रसारण स्टुडीओ आणि यंत्रणेचे लोकार्पण येत्या गुढी पाडव्याला, दि. २८ मार्च २०१७ रोजी होत आहे.

यावेळी प्रख्यात गायक सुरेश वाडकर, जिल्हाधिकारी अनिल कवडे, आदर्श गाव हिवरे बाजारचे प्रणेते पोपटराव पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्क प्रमुख राजाभाऊ मुळे आदींच्या उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता बालिकाश्रम रस्त्यावरील रेडीओ केंद्राच्या वास्तुत होणारा हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असला तरी सर्व नगरकर आपला रेडिओ ९०.४ ला ट्यून करून यात सहभागी होऊ शकतील.

स्नेहालय संस्थेचे रेडिओ नगर ९०.४ एफ.एम हे सामुदायिक रेडीओ केंद्र गेल्या सात वर्षापासून शहरात कार्यरत आहे. शासनाचे योजना, ध्येय-धोरणे, सर्वसमान्य नगरकरांच्या प्रतिक्रिया-अपेक्षा, यांना व्यक्त करणाऱ्या या केंद्राने सर्वसामान्य नगरकरांचे लोकमाध्याम म्हणून अल्पावधीत लोकमान्यता मिळवली आहे. नगरचा इतिहास, संस्कृती, कला-क्रीडा, सामाजिक चळवळी, रचनात्मक कार्य, व्यापार आणि उद्योगाचे प्रश्न, यांचा निर्भीड अविष्कार या रेडीओ वाहिनीने केला.

२४ तास चालणारे आणि लोकवर्गणीतून उभे राहिलेले हे रेडिओ केंद्र भारतातील माध्यम क्षेत्रात नावाजले गेले. या रेडिओ केंद्राचे स्टुडिओ आणि प्रसारण यंत्रणा यांचे नुतनीकरण लोकवर्गणीतून करण्यात आले आहे त्यामुळे आता भारतातील सामुदायिक रेडिओ केंद्रात सर्वात अद्ययावत आणि प्रभावी अशी अग्रणी  रेडिओ वाहिनी  अशी ओळख ‘रेडिओ नगर’ हे केंद्र बनले आहे.

मोफत जाहिरातीची संधी - माध्यम क्षेत्रात प्रथमच पुढील ७ दिवस आपल्या सेवा, संस्था आणि उत्पादनांची मोफत जाहिरात  करण्याची संधी रेडीओ नगर ९०.४ एफ.एम. ने नगरकरांसाठी  घोषित केली आहे. तसेच कला, समाजसेवा, साहित्य, विविध व्यवसाय, क्रीडा, या क्षेत्रात अभिनव कार्य करणाऱ्या परंतु माध्यमातून आजवर प्रसिद्धी न मिळालेल्या नगरकरांच्या विशेष मुलाखती हे रेडिओ केंद्र घेणार आहे.

या मुलाखतींचे प्रसारण करणार आहे. या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी ९०११११२३९० आणि ९९७०९८२५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रेडिओ नगर केंद्रातर्फे डॉ. गोपाळ मिरीकर, रुपाली देशमुख, श्रेणिक शिंगवी, सिद्धांत खंडागळे, तेजश्री फुलसौंदर, प्रशांत जठार, सुरज सोळसे, शर्वरी मुळे, पी. डी. कुलकर्णी, आदींनी केले आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget